Advertisement

राणीच्या बागेत पर्यटक घटले, पण कमाई वाढली!


राणीच्या बागेत पर्यटक घटले, पण कमाई वाढली!
SHARES

प्रवेश फीचे वाढवलेले दर आणि घटलेली पर्यटकांची संख्या, हे दोन्ही घटक असूनही भायखळा प्राणी संग्रहालय अर्थात राणीच्या बागेचा महसूल जवळपास 300 टक्क्यांनी वाढला आहे.

जुलै 2016पर्यंत प्रौढांसाठी 5 रुपये तर लहान मुलांसाठी 2 रूपये असं प्रवेशशुल्क आकारण्यात येत होतं. मात्र ऑगस्ट महिन्यापासून यामध्ये तब्बल 50 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली. याशिवाय चार सदस्यांच्या एका कुटुंबालाही 50 रुपये तिकीट आकारण्यात येऊ लागलं. त्यामुळे उद्यानाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली.

तिकीटदर वाढवल्यापासून पर्यटकांची संघ्या 49 टक्क्यांनी घटली आहे, मात्र त्याच वेळी राणीच्या बागेचा एकूण महसूल मात्र 288 टक्क्यांनी वाढला आहे. पर्यटकांच्या संख्येचा विचार करता, एकट्या जुलै महिन्यात 1 लाख 14 हजार 808 पर्यटकांच्या मोबदल्यात उद्यानानं तब्बल 8 लाख 79 हजार 424 रुपयांची कमाई केली. मात्र ऑगस्ट महिन्यात तिकीटदरवाढ केल्यानंतर सुमारे 70 लाखांची कमाई उद्यानानं केली आहे, पण पर्यटकांची संख्या मात्र 76 हजार 944 इतकीच राहिली, असे वृत्त टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

मागील वर्षी जुलै महिन्यात दक्षिण कोरियातील सेऊलहून हॅम्बोल्ट प्रजातीचे पेंग्विन राणीच्या बागेत आणण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर या वर्षी तिकीट दरवाढ करण्यात आली. मात्र, तिकीट दरवाढीच्या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.हेही वाचा

राणीबागेसह पेंग्विन दर्शन 50 रुपयांमध्येच!


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय