Advertisement

भाजीपाल्याचा भावात ५० टक्के घसरण

नवी मुंबईतील एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात घसरण झाली आहे.

भाजीपाल्याचा भावात ५० टक्के घसरण
SHARES

भाजीपाला मार्केटमध्ये ५० टक्के घसरण झाल्याची माहिती समोर येत आहे. नवी मुंबईतील एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात घसरण झाली आहे. सणासुदीच्या काळातही मार्केटमध्ये ग्राहक नसल्याने भाज्यांचा मालाला उठाव कमी झाला आहे. मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये जवळपास ६२२ गाड्यांची आवक झाली आहे. मात्र तरीही भाजीपाल्याच्या दरात घसरण सुरूच आहे.

कोबी १० रुपये, कोथिंबीर ६ रुपये, काकडी ६ रुपये, टोमॅटो १५ रुपये तर दुधी १२ रुपये किलोनं विकला जात आहे. सध्या एपीएमसी मार्केटमध्ये ६०० हून अधिक गाड्यांची आवक झाली आहे. मात्र सण असूनही मार्केटमध्ये ४० टक्के माल शिल्लक असल्याचे पाहायला मिळत आहे.

सध्या बाजारात फ्लॉवर ८ ते १० रुपये, कोबी ८ ते १२ रुपये, मिरची २० ते ३० रुपये, काकडी ६ ते १० रुपये किलो विकली जात असून, टोमॅटो १५ ते २० रुपये, वांगी १५ ते २० रुपये तर कोथिंबीर ५ ते १० रुपये, मेथी १० ते १५ रुपये, पालक ५ ते १० रुपये दराने विकली जात आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा