Advertisement

करमबीर सिंह भारताचे नवे नौदल प्रमुख; ३१ मे रोजी पदभार स्वीकारणार

व्हाईस अॅडमिरल करमबीर सिंह हे देशाचे नवे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. विद्यमान नौदल प्रमुख सुनील लांबा हे येत्या ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी करमबीर सिंह कार्यभार सांभाळतील.

करमबीर सिंह भारताचे नवे नौदल प्रमुख; ३१ मे रोजी पदभार स्वीकारणार
SHARES

व्हाईस अॅडमिरल करमबीर सिंह हे देशाचे नवे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. विद्यमान नौदल प्रमुख सुनील लांबा हे येत्या ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी करमबीर सिंह कार्यभार सांभाळतील. करमबीर सिंह सध्या विशाखापट्टणम येथे पूर्व नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत. 


१९८० पासून सेवेत

करमबीर सिंह हे १९८० साली नौदलात दाखल झाले. तसंच १९८२ साली ते वैमानिक बनले. तसंच चेतक आणि चेतक आणि कामोव हेलिकॉप्टर उड्डाणाचा त्यांना दांडगा अनुभव आहे. नौदलातील ३९ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत सिंह यांनी निरनिराळ्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.


खडकवासलातून प्रशिक्षण

प्रदीर्घ सेवेदरम्यान त्यांना विशिष्ट सेवा पदक आणि परम विशिष्ट सेवा पदकानंही सन्मानित करण्यात आलं आहे. करमबीर सिंह यांनी नॅशनल डिफेंस अॅकॅडमी खडकवासला मधून आपलं शिक्षण घेतलं आहे. याव्यतिरिक्त त्यांनी ब्रिटनमधील वेलिंग्टनमध्ये असलेल्या डिफेंस सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज आणि मुंबईतील कॉलेज ऑफ नेव्हल वॉरफेअरमधून शिक्षण घेतलं आहे. 

तसंच त्यांनी आपल्या कार्यकाळात इंडियन कोस्ट गार्ड शिपच्या कमांडर पदाची धुराही यशस्वीरित्या सांभाळली होती. ३१ मे २०१६ रोजी त्यांनी नौदलाच्या व्हाईस चीफ पदाचा कार्यभार स्वीकारला होता. आता ३१ मे रोजी ते नौदल प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत.




हेही वाचा -

न्यायालयात गैरहजर राहण्यासाठी चोक्सीची याचिका

‘अलिबागवरून आलायस का?’ म्हणण्यावर बंदी घाला; हायकोर्टात याचिका



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा