Advertisement

तानसा, वैतरणा ओव्हरफ्लो, गावांना सतर्कतेचा इशारा

मुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसा आणि वैतरणा धरणं पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागली आहेत. त्यामुळे तानसा तसंच वैतरणा नदी किनाऱ्यावरील ७५ गावांना पुराचा इशारा देण्यात आला आहे.

तानसा, वैतरणा ओव्हरफ्लो, गावांना सतर्कतेचा इशारा
SHARES

मुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसा आणि वैतरणा धरणं पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागली आहेत. त्यामुळे तानसा तसंच वैतरणा नदी किनाऱ्यावरील ७५ गावांना पुराचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये वैतरणा नदी किनाऱ्यावरील ४२ आणि तानसा नदीच्या किनाऱ्यावरील ३३ गावांचा समावेश आहे. 

गेल्या काही दिवासांपासून धरण क्षेत्रांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. परिणामी शहापूर तालुक्यातील खर्डी गावाजवळ असलेलं वैतरणा धरण तसंच शहापूर तालुक्यातील तानसा धरणही लवकरच पूर्ण ओसंडून वाहण्याची शक्यता आहे. पुढचे काही दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास तानसा आणि वैतरणा नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे.  यामुळे खरबदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिकेने या धरणांच्या प्रभावक्षेत्रात येणाऱ्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तसंच भिवंडी, शहापूर आणि वाडा येथील तहसिलदारांना पत्रं पाठवली आहेत. या पत्रात परिसरातील रहिवाशांना पुराची कल्पना देऊन सावध राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  

 


हेही वाचा-

जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी, मुंबई-गोवा हाय वे बंद

प्रक्रिया करूनच सांडपाणी समुद्रात सोडा, हायकोर्टाचे महापालिकेला आदेश



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा