Advertisement

ठाण्यातील 'हा' मॉल प्रवेशासाठी आकारणार शुल्क

ग्राहकांना मॉलमध्ये प्रवेश करायचा असल्यास टोकन घ्यावं लागणार आहे. प्रवेश शुल्कही भरावा लागणार आहे.

ठाण्यातील 'हा' मॉल प्रवेशासाठी आकारणार शुल्क
SHARES

१ ऑगस्टपासून मिशन बिगिन अगेन ही मोहीम राबवण्यात येणार आहे. या टप्प्यात ५ ऑगस्टपासून मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी ठाण्यातील विवियाना मॉलनं खबरदारीचा उपाय म्हणून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ग्राहकांना मॉलमध्ये प्रवेश करायचा असल्यास टोकन घ्यावं लागणार आहे. प्रवेश शुल्कही भरावा लागणार आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विवियाना मॉलनं एक सर्वेक्षण केलं होतं. या सर्वेक्षणात मॉल पुन्हा सुरू करावे का? तसंच, मॉल सुरू केल्यानंतर खरेदीदार मॉलमध्ये येणार का? आल्यास कोणत्या गोष्टींना अधिक प्राधान्य असेल? या सारखे अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. या सर्वेक्षणांच्या आधारेच मॉलच्या प्रशासनानं महत्त्वाचे निर्णय घेतले आहे.

हेही वाचा : शॉपिंग मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स या तारखेपासून उघडणार

मॉलमध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होते. त्यामध्ये विंडो शॉपिंग आणि विंकेडमध्ये रेंगाळणाऱ्यांची संख्याही अधिक असते. यासाठीच प्रशासनानं ऑनलाइन बुकिंग करून ठराविक काळासाठी खरेदीदारांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी काही १० रुपयांचे शुल्कही आकारण्यात येणार आहे.

मॉलमध्ये प्रवेश घेण्यासाठी मॉलच्या अधिकृत वेबसाइटवरून पुर्वनोंदणी आणि १० रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे. यासाठी ऑनलाईन तिकट बुकींग संस्थेसोबत विवियाना मॉल तर्फे करार करण्यात आला आहे. नोंदणी केल्यानंतर मिळणारा क्यूआर कोड स्कॅन करून मॉलमध्ये प्रवेश मिळणार आहे. पूर्व नोंदणी नसल्यास खरेदीदारांना मॉलमध्ये प्रवेश मिळणार नसल्याचंही प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.



हेही वाचा

सिद्धार्थ महाविद्यालयाला डागडुजीसाठी १२ कोटींचा निधी

Electricity Bill: सर्वसामान्यांना वीज बिलात सवलत? सरकार ‘अशा’ पद्धतीने करतंय विचार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा