'मोनो स्थानकाला 'प्रतिपंढरपूर विठ्ठल मंदिर' नाव द्या'

 Dadar
'मोनो स्थानकाला 'प्रतिपंढरपूर विठ्ठल मंदिर' नाव द्या'

वडाळा - वडाळा नागरिक दक्षता समिती येत्या बुधवारी 1 मार्चला वडाळ्यातील विठ्ठल मंदिराशेजारीच उपोषण करणार आहे. वडाळा ते जेकब सर्कल या मोनोच्या दुसर्‍या टप्प्यातील मार्गावरील प्रस्तावित असलेल्या दादर पूर्व स्थानकाचे नाव बदलून 'प्रतिपंढरपूर विठ्ठल मंदिर' नाव देण्यात यावे अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली होती. तसंच एमएमआरडीए, मुख्यमंत्री आणि लोकप्रतिनिधींना नाव बदलाबाबत लेखी निवेदनही देण्यात आलं होतं. मात्र तीन महिने झाले तरी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्याने समितीच्यावतीने हा निर्णय घेण्यात आल्याचं समितीचे प्रतिनिधी दिपक शिंदे यांनी सांगितले. या उपोषणादरम्यान विठ्ठल नामाचा गजर आणि टाळ, मृदूंग तसेच भजन, कीर्तन करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

उपोषणानंतरही प्रश्न मार्गी न लागल्यास या स्थानकाला जोपर्यंत प्रतिपंढरपूर विठ्ठल मंदिर स्थानक हे नाव दिले जात नाही तोपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार असून, वेळ पडली तर हे उपोषण असेच सुरू ठेवण्यात येईल असं समितीचे सचिव कुबेर काळे यांनी सांगितले.

Loading Comments