Advertisement

वडाळ्यातील स्कायवॉकवर फेरीवाल्यांचं साम्राज्य


वडाळ्यातील स्कायवॉकवर फेरीवाल्यांचं साम्राज्य
SHARES

वडाळा - मुंबईत अनेक ठिकाणी स्कायवॉक बांधण्यात आले आहेत. एमएमआरडीएने 41 कोटींपेक्षा जास्त पैसा खर्चून असाच एक स्कायवॉक वडाळा येथे बांधला. या स्कायवॉकचा पादचाऱ्यांना नक्कीच फायदा झाला. परंतु सध्या या स्कायवॉकवर घाणीचं साम्राज्य पसरलं आहे. या ठिकाणी कचरापेटीची व्यवस्था नाही. त्याचबरोबर अनेक जाहिरातींनी या स्कायवॉकला विद्रुप करून टाकले आहे. इतकेच नाही तर फेरीवाल्यांनी संधी साधत आपले बस्तान इथे बसवले आहे.
येथील स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी करून देखील परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. या संदर्भात मुंबई पोर्ट ट्रस्ट वसाहतीचे निरीक्षक यांना विचारले असता याबाबत एमएमआरडीएकडून तितकासा प्रतिसाद मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा