वाळकेश्वर गुढी पाडव्यासाठी सज्ज

Walkeshwar
वाळकेश्वर गुढी पाडव्यासाठी सज्ज
वाळकेश्वर गुढी पाडव्यासाठी सज्ज
See all
मुंबई  -  

वाळकेश्वर - गुढी पाडव्यानिमित्त वाळकेश्वरमध्ये शोभा यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे. तीनबत्ती साईबाबा बस स्थानक परिसरातून ही शोभा यात्रा काढली जाणार आहे. पुढे खंडोबा मंदिर, जबरेश्वर गल्ली, बाणगंगा चौक, भगवान इंद्रजीत मार्ग, माता पार्वतीनगर आणि प्रेमनगरपर्यंत ही शोभा यात्रा काढली जाणार आहे.

या शोभायात्रेत विविध संस्कृतीचं दर्शन घडणार आहे. यात मोठ्या प्रमाणात सामाजिक संघटना आणि शाळकरी मुलांसह ३००० जण सहभागी होणार आहेत. त्यासोबतच पारंपारिक ढोल-ताशा पथक आणि लेझीम पथकाचं प्रदर्शन देखील पाहायला मिळणार आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.