Advertisement

प्रभाग 139मध्ये कुणाचा झेंडा


प्रभाग 139मध्ये कुणाचा झेंडा
SHARES

गोवंडी - शिवाजीनगरच्या वॉर्ड क्रमांक 139 मधून महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात दिग्गज उमेदवार उतरलेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगरसेवक राजेंद्र वाघमारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भारीपचे नगरसेवक अरूण कांबळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वेल्यू स्वामी नायडू, शिवसेनेकडून कृष्णा पाटील आणि अपक्ष म्हणून रमेश कांबळे मैदानात उतरले आहेत. रमेश कांबळे हे काँग्रेसचे नगरसेवक होते. मात्र त्यांना उमेदवारी दिली नाही म्हणून ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. शिवसेनेचे उमेदवार कृष्णा पाटील हे पोलीस विभागात कार्यरत होते. त्यांनी निवृत्ती घेत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र त्यांच्यासमोर आव्हान आहे ते गंगाराम कांबळे यांचे. गंगाराम कांबळे हेही निवृत्त पोलिस अधिकारी आहेत. ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

129 आणि 137 या दोन वॉर्डचे काही भाग जोडून 139  वॉर्ड तयार झाला आहे. त्यामुळे येथे अनेकांना राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्याचवेळी दलित आणि मुस्लिम समाजाची मोठी वोट बँक येथे असल्याने हा वर्ग कोणाच्या पाठिशी उभा रहातो हेही महत्त्वाचे ठरणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा