विविध मागण्यांसाठी परीट समाज आक्रमक

 Mumbai
विविध मागण्यांसाठी परीट समाज आक्रमक
विविध मागण्यांसाठी परीट समाज आक्रमक
See all

मुंबई - महाराष्ट्र परीट सेवा मंडळ आणि आरक्षण कृती समितीच्या वतीने शुक्रवारी परीट समाजाने आपल्या मागण्यांसाठी एकदिवसीय आंदोलन पुकारले होते. या एकदिवसीय आंदोलनात मुंबईसह महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून अनेक आंदोलनकर्ते आले होते.

परीट समाजाचा देशाच्या 17 राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही अनुसुचित जातींमध्ये समावेश करावा, लॉन्ड्री व्यावसायिकांना वीज दरात सवलत देण्यात यावी, शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये संत गाडगे महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी आझाद मैदान येथे मोठ्या संख्येने परीट समाज एकवटला होता. पुढील दोन ते तीन दिवसांतच या मागण्यांवर विचार व्हावा असे सुरेश नाशिककर यांऩी सांगितले. यावेळी महाराष्ट्र परीट महासंघ प्रदेशाध्यक्ष सुरेश नाशिककर, एकनाथ बोरसे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Loading Comments