Advertisement

मुंबईकरांना 'लेझर शो'मधून बाबासाहेबांचा जीवनपट पाहण्याची संधी

मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली.

मुंबईकरांना 'लेझर शो'मधून बाबासाहेबांचा जीवनपट पाहण्याची संधी
SHARES

मुंबई भाजपच्या वतीने २२७ प्रभागांमध्ये जयंती उत्सव आणि विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहे. तसेच ३० ठिकाणी भीमयात्रा काढण्यात येणार असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रेरणादायी जीवनपट उलघडून दाखविणारा ‘लेजर शो’ वरळीत आयोजित करण्यात आला आहे.

मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. भाजपतर्फे आज, १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ७३ पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून भाजप खासदार, आमदार, माजी नगरसेवक, पदाधिकारी, मोर्चा आघाडीचे पदाधिकाऱ्यांतर्फे अभिवादन करण्यात आले.

वरळीत रविवारी ‘लेझर शो’

वरळी येथील जांबोरी मैदानात भाजप पदाधिकारी संतोष पांडे यांच्या पुढाकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रेरणादायी जीवनपट उलगडून दाखविणाऱ्या भव्य ‘लेझर शो’चे आयोजन रविवारी, १६ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ ते १० या वेळेत करण्यात आले आहे.



हेही वाचा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दादरमध्ये वाहतुकीत बदल

ठाण्यातील जांबळी नाका भाजी मंडई १५ एप्रिलपासून बंद

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा