Advertisement

मंत्रालयातही 'टिप टिप बरसा पाणी'..!


मंत्रालयातही 'टिप टिप बरसा पाणी'..!
SHARES

गुरुवारी सकाळी मुंबईत पावसाचं दमदार आगमन झालं. अवघ्या तासभर पडलेल्या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं. त्यामुळे मुंबईकरांना गुडघाभर पाण्यातून वाट काढतच चाकरमान्यांना आॅफिस गाठावं लागलं. तर अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे त्यांना घराबाहेर पडणंही मुश्कील झालं. मुंबईकरांवर दयामाया न दाखवता कोसळणाऱ्या पावसाने अशीच काहीशी अवस्था मंत्रालयाचीही केली. पशु संवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्या दालनाबाहेर पाण्याची गळती लागल्याने ही गळती थांबवण्यासाठी शिपाई अन् कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. 


नेमकं काय झालं?

मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर पशु संवर्धनमंत्री महादेव जानकर यांचं दालन आहे. त्यांच्या दालनाबाहेर इमारतीच्या छतावरून पावसाच्या पाण्याची गळती होत होती. त्यामुळे त्यांच्या दालनाबाहेरून येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांना, कर्मचाऱ्यांना या पाणी गळतीतून मार्ग काढावा लागत होता. 



त्यानंतर महापालिकेच्या कंत्राटी कामगारांच्या साहाय्याने जानकरांच्या कार्यालयाबाहेर साचलेलं पाणी उपसण्याचं काम सुरू करण्यात आलं. राज्याच्या मंत्र्यांच्या दालनाबाहेरचं हे चित्र पाहून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. याप्रकरणी कुणावर कारवाई करण्यात येणार की टाळाटाळ होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


मंत्री अनुपस्थित

पाण्याची गळती होत असताना जानकर दालनात उपस्थित नसल्याने एरवीप्रमाणे त्यांच्या दालनात गर्दी नव्हती. या गळतीबाबत संबंधित विभागाला कळवण्यात आलं असून लवकरच छताची दुरुस्ती केली जाईल, असं कर्मचाऱ्यांनकडून सांगण्यात येत आहे.



हेही वाचा-

मुंबईकरांनो जपून, या दिवशी येणार हायटाईड



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा