Advertisement

मुंबईतल्या ७ सरोवरांमधील पाण्याची पातळी ९९ टक्क्यांहून अधिक

तुळशी, तानसा, विहार, भातसा, मोडक सागर, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा हे तलाव आणि धरणाचे जलाशय मुंबईला पिण्याचे पाणी पुरवतात.

मुंबईतल्या ७ सरोवरांमधील पाण्याची पातळी ९९ टक्क्यांहून अधिक
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) उघड केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाण्याची पातळी बुधवार, ६ ऑक्टोबर रोजी ९९ टक्क्यांवर गेली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात तलावांमध्ये पाण्याची पातळी ९८.६० टक्के इतकी होती.

आकडेवारीनुसार, सात तलावांमध्ये १४,३६,१८३ दशलक्ष लिटर पाणी आहे. पूर्ण क्षमतेच्या तुलनेत ९९ टक्के, जे सुमारे १४.४७ लाख दशलक्ष लिटर आहे. दरम्यान, गेल्या वर्षी याच काळात पाणीसाठा ९८.६० टक्के होता, तर २०१९ मध्ये पाणीसाठा ९८.९२ टक्के होता.

मुंबईसाठी पिण्यायोग्य पाण्याचे दोन प्रमुख स्त्रोत - तानसा आणि मोडक सागर तलाव - २२ जुलै रोजी ओसंडून वाहू लागले, असे पालिकेनं सांगितलं. तर विहार आणि तुळशी तलाव अनुक्रमे १६ आणि १८ जुलैला भरून गेले. ११ सप्टेंबर रोजी भातसा तलावाचे ५ दरवाजे उघडण्यात आले.

मोडक सागर इथं ९७.५९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे, मध्य वैतरणा ९७.७८ टक्के, अप्पर वैतरणा ९९.७९ टक्के, भातसा ९९.४३ टक्के, विहार १०० टक्के आणि तुळशीमध्ये ९९.४६ टक्के उपयुक्त पाणी पातळी उपलब्ध आहे.

तुळशी, तानसा, विहार, भातसा, मोडक सागर, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा हे तलाव आणि धरणाचे जलाशय मुंबईला पिण्याचे पाणी पुरवतात.हेही वाचा

क्लिनअप मार्शलची दंडवसुली ऑनलाईन?

शाळा कॉलेज सुरू; मात्र रेल्वेचे दार अद्याप बंदच

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा