Advertisement

अरबी समुद्राच्या पातळीत वाढ?

मुंबईतील समुद्रकिनारे हे मुंबईकर व मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी पर्यटनस्थळ आहेत. अनेक नागरीक आपल्या कुटुंबासोबत इथं येत असतात. मात्र आता हेच समुद्रकिनारे नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकतात.

अरबी समुद्राच्या पातळीत वाढ?
SHARES

मुंबईतील समुद्रकिनारे हे मुंबईकर व मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी पर्यटनस्थळ आहेत. अनेक नागरीक आपल्या कुटुंबासोबत इथं येत असतात. मात्र आता हेच समुद्रकिनारे नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकतात. याच कारण म्हणजे अरबी समुद्रातील पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याची माहिती समोर येत आहे. १९९० ते २०१९ या कालावधीत घेतल्या गेलेल्या सॅटेलाइट चित्रांचा आभ्यासातून हे समोर आलं आहे. आतापर्यंत १०७ चौरस किलोमीटर इतका भूभाग समुद्राखाली गेला आहे.

मानवाचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात नैसर्गिक अधिवासात वाढल्यामुळं समुद्राची पातळी वाढली आहे. जर अजूनही अशाच प्रकारे हस्तक्षेप वाढत असेल तर लवकरच संपूर्ण मुंबईत पुराचा धोका जाणवेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. पर्यावरणातील असंतुलनाचा परिणामही समुद्र, नदी व इतर नैसर्गिक संसाधनांवर होत असल्याचंही अभ्यासातून समोर आलं आहे.

समुद्र किनारी असलेल्या रहिवाशी सोसयट्या व घरे यांना भविष्यात अधिक धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः पावसाळ्यात हे संकट अधिक वाढेल, असंही तज्ज्ञ सांगतात. गेल्या ३० वर्षांपासून समुद्राच्या पातळीत वाढ होत असल्यानं चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोकण परिसरातही समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे.

सृष्टी कंजर्वेशन फाउंडेशननं यावर सखोल अभ्यास केला आहे. 'समुद्र किनाऱ्यावर होणारे अतिक्रमण आणि संरचनेत बदल यामुळं समुद्रानं भूगाग व्यापला आहे. संजय गांधी नॅशनल पार्कच्या जमीनीबाबत ही बाब ठळकपणे जाणवते. मुंबई आणि ठाण्यातील खाडीच्या जमिनीवर ४५ चौरस किलीमीटर पर्यंतच्या नदी - नाल्याच्या क्षेत्रात दलदल निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा -

लसीकरण केंद्रावर प्रचंड गर्दी; ३० ते ४४ वयोगटाच्या मोफत लसीकरणात गोंधळ

मुंबईत २७ जूनपर्यंत निर्बंध; काय सुरू, काय बंद?


संबंधित विषय
POLL

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसे-भाजप यांची युती होईल, असं वाटतं का?
Submitting, please wait ...
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा