Advertisement

कल्याण-डोंबिवलीत मंगळवारी पाणीपुरवठा बंद

कल्याण-डोंबिवलीच्या काही भागांतील पाणीपुरवठा मंगळवार दिनांक २४ ऑगस्ट रोजी बंद राहणार आहे. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

कल्याण-डोंबिवलीत मंगळवारी पाणीपुरवठा बंद
SHARES

कल्याण-डोंबिवलीच्या काही भागांतील पाणीपुरवठा मंगळवार दिनांक २४ ऑगस्ट रोजी बंद राहणार आहे.  कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नेतिवली आणि मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात विद्युत व यांत्रिकी उपकरणाच्या देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचं पालिकेने म्हटलं आहे. 

महापालिकेच्या १५० द.ल.ली. नेतिवली जलशुद्धीकरण केंद्र व १०० द.ल.ली. मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत व यांत्रिकी उपकरण देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कामामुळे मंगळवारी सकाळी ९ ते संध्याकाळी ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

डोंबिवली पूर्व व पश्चिम, कल्याण ग्रामीण तसेच कल्याण पश्चिमेतील भोईरवाडी, शहाड, रामबाग, चिकणघर, घोलपनगर, मिलिंदनगर, योगीधाम, मुरबाड रोड, अशोकनगर, वालधुनी, शिवाजीनगर, जोशीबाग, बिर्ला कॉलेज ते खडकपाडा रोड आणि कल्याण स्टेशन परिसरातील पाणीपुरवठा १२ तास बंद ठेवण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा