गिरणी कामगारांच्या तोंडचे 'पाणी' पळाले


SHARE

मुंबई - म्हाडाच्या गिरणी कामगारांच्या वसाहतीतील रहिवाशांना सध्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणी टंचाईचा प्रश्न काही केल्या मार्गी लागत नसल्याने आता येथील गिरणी कामगारांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

2012 मध्ये 19 गिरण्यांच्या जमिनीवरील 31 इमारतींमधील अंदाजे 7000 घरांसाठी सोडत काढण्यात आली. त्यानंतर या घरांचा ताबा देण्यात आला. या वसाहतींना दररोज सुमारे 1 लाख 90 हजार लिटर पाणी पुरवठा केला जाणार असताना प्रत्यक्षात मात्र 70 ते 80 हजार लिटर इतकाच पाणी पुरवठा होत आहे. या अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे गिरणी कामगारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यातच संक्रमण शिबिरार्थी येथे राहत असल्याने गिरणी कामगार आणि संक्रमण शिबिरार्थींमधील संघर्षही वाढत चालला आहे. संक्रमण शिबिरार्थींमुळे आपल्याला पाणी कमी पडत असल्याचे म्हणत आता गिरणी कामगारांनी संक्रमण शिबिरार्थींना आमच्या इमारतींएवजी स्वतंत्र इमारतीत स्थलांतरीत करावे, अशी मागणीही केल्याचे गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांनी स्पष्ट केले आहे.

पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर गिरणी कामगार नेत्यांकडून प्रत्येक इमारतीत बैठका घेतल्या जात आहेत. तर कामगारांच्या इतर  समस्याही जाणून घेतल्या जात आहे.  त्यानुसार पाणी टंचाई दूर करण्याची तसेच संक्रमण शिबिरार्थींना स्वतंत्र इमारतीत स्थलांतरीत करण्याची मागणी म्हाडा आणि सरकारसमोर ठेवण्यात येईल. ही मागणी मान्य न झाल्यास कामगार रस्त्यावर उतरतील 

- दत्ता इस्वलकर, गिरणी कामगार नेते

संबंधित विषय
ताज्या बातम्या