Advertisement

राणीबागेत आता 25 हजार पर्यटकांना प्रवेश


राणीबागेत आता 25 हजार पर्यटकांना प्रवेश
SHARES

भायखळा - येथील वीरमाता जिजाबाई उद्यान व प्राणीसंग्रहालयात (राणीबाग) हॅम्बोल्ट पेंग्विन कक्ष हे मुंबईकरांचे प्रमुख आकर्षण ठरत असून शनिवारी तब्बल 40 हजारांहून जास्त मुंबईकरांनी पेंग्विन दर्शनाचा आनंद घेतला. हॅम्बोल्ट पेंग्विन्स पाहण्याकरीता नागरिकांची झुंबड पाहायला मिळाली. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून यापुढे 25 हजार पर्यटकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. तसंच सुरक्षेच्या कारणामुळे प्राणिसंग्रहालयचे मुख्य प्रवेशद्वार दुपारी 3 वाजता बंद करण्यात येणार आहे. तिकीट विक्रीही 3 वाजता बंद करण्यात येणार आहे, असं वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयाचे प्रभारी संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईकर नागरीक तसंच पर्यटक आदींनी पालिका प्रशासनास योग्य ते सहकार्य करावे तसेच उद्यान व प्राणीसंग्रहालयातील हॅम्बोल्ट पेंग्विन्सचे शांततेत व शिस्तबद्धरित्या पहावे. नागरिकांनी या सूचनाचे पालन करून पालिकेस सहकार्य करावे असं आवाहनही डॉ. त्रिपाठी यांनी केले आहे.हे उद्यान व प्राणीसंग्रहालय सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत पुढील सूचना मिळेपर्यंत खुले राहिल. तसेच दर बुधवारी साप्ताहिक सुट्टी निमित्त उद्यान व प्राणीसंग्रहालय बंद राहिल, असेही त्यांनी सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा