वाटचाल हगणदारी मुक्तीकडे

  Pali Hill
  वाटचाल हगणदारी मुक्तीकडे
  मुंबई  -  

  मुंबई - महानगरपालिका क्षेत्र हगणदारी मुक्त करण्याच्या पालिकेच्या प्रयत्नाला यश आलंय. पालिकेकडून सातत्यपूर्ण प्रबोधन, सर्वस्तरीय प्रयत्न आणि हगणदारी असणाऱ्या ठिकाणी नवीन शौचालयं बांधणं किंवा फिरती शौचालयं उपलब्ध करुन देण्याची पालिकेची रणनीती यशस्वी ठरलीय. यामुळे 24 प्रशासकीय विभागांपैकी 18 विभाग हगणदारीमुक्त करण्यात पालिकेला यश आलंय. ऑक्टोबर 2016 मध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार पालिकेच्या 24 विभागांमध्ये 118 ठिकाणी हगणदारी असल्याचं निदर्शनास आलं होतं. मुंबईकरांच्या सकारात्मक सहकार्यामुळे या हगणदारी ठिकाणांची संख्या 83 टक्क्यांनी घटून आता 20 वर आलीय. 6 विभागांमध्ये असणारी उर्वरित 20 ठिकाणे देखील हगणदारीमुक्त करण्यासाठी पालिका अथक प्रयत्न करीत असून, नागरिकांनीही पालिकेला मोठ्या प्रमाणात सहकार्य करावं, असं आवाहन घनकचरा व्यवस्थापन खात्याचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी केलंय.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.