पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी प्रवाशांना मनस्ताप झाला आहे.
तांत्रिक समस्येमुळे सर्व अप आणि डाऊन जलद उपनगरीय लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. झालेल्या गैरसोयीबद्दल मनापासून खेद आहे, असे ट्विट पश्चिम रेल्वे तर्फे करण्यात आले आहे.