Advertisement

पश्चिम रेल्वेच्या हद्दीतल्या नाल्यांमधील गाळाचा शोध घेण्याचं काम ७० टक्के पुर्ण


पश्चिम रेल्वेच्या हद्दीतल्या नाल्यांमधील गाळाचा शोध घेण्याचं काम ७० टक्के पुर्ण
SHARES

महापालिकेने नालेसफाईचे पैसे देऊनही रेल्वेकडून नाल्यांची सफाई होत नाही. त्यामुळे पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी तुंबून लोकल सेवा विस्कळीत होत असते. परंतु, यंदा पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील नाल्यांमधील सफाईच्या कामांचा शोध रेल्वेकडून आतापासूनत घेतला जात आहे. आतापर्यंत यासर्व नाल्यांमधील गाळाचा शोध घेण्याचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. तर ३१ मार्चपर्यंत याचा अहवाल महापालिकेला सादर केला जाईल, असं आश्वासन पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेला दिलं आहे.


यांची उपस्थिती

मुंबईतील पश्चिम रेल्वे हद्दीतील नाले आणि त्यामुळे निर्माण होणारी दरवर्षीची पुर परिस्थिती तसेच महापालिकेने याचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी उच्चस्तरीय बैठक महापालिका मुख्यालयात बोलावली होती. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या प्रयत्नाने महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या दालनात पार पडलेल्या या बैठकीला पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार गुप्ता, अतिरिक्ति आयुक्त विजय सिंघल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकूल जैन यांच्यासह रेल्वे आणि महापालिकेचे वरिष्ठ अभियंते आणि संबधित अधिकारी उपस्थित होते.


अहवाल महापालिकेला सादर

पश्चिम रेल्वेच्या हद्दीत एकूण ४३ नाले आहेत. या नाल्यांयमधील मॅनहोलमधून कॅमेरा टाकून आतील स्थितीची पाहणीचं काम ७० टक्के पुर्ण झाले असल्याची माहिती यावेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसेच त्याबाबत करावयाच्या उपाययोजनांचा सविस्तर अहवालही रेल्वेने महापालिकेला सादर केला. या मार्गावर एकूण १० ठिकाणी पाणी तुंबणारी ठिकाणे आहेत. यासर्व नाल्यांमधील ७० टक्के पाहणी पुर्ण झाली आहे. उर्वरीत पाहणीचं काम संयुक्तपणे ३१ मार्च पर्यंत पुर्ण करून त्याचा अहवाल महापालिकेला सादर करण्यात येईल, असं या बैठकीत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा