Advertisement

प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय? जाणून घ्या ती कशी काम करते?

प्लाझ्मा थेरपी काय आहे? हिचा वापर भारतात होतोय का? यामुळे कोरोनाचं संकट दूर व्हायला मदत होईल का? हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात.

प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय? जाणून घ्या ती कशी काम करते?
SHARES

३० जानेवारी २०२० रोजी भारतात कोरोनाव्हायरसचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतरच्या ९ महिन्यात, कोरोनानं भारतात चांगलेच हातपाय पसरले आहेत. आजही देशातील अनेक नागरिक कोरोना संक्रमित आहेत. तर अनेकांना आपला जीव गमावला आहे. कोरोनावर प्रभावशाली लसीचा शोध सुरूच आहे. परंतु या दरम्यान COVID 19 च्या उपचारांसाठी प्लाझ्मा थेरपी हा एक पर्याय म्हणून उदयास आला आहे.

पण ही थेरपी काय आहे? हिचा वापर भारतात होतोय का? यामुळे कोरोनाचं संकट दूर व्हायला मदत होईल का? हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात.

प्लाझ्मा थेरपी काय आहे?

आपल्या शरीरामधील रक्ताचे 4 मुख्य घटक लाल रक्त पेशी, पांढऱ्या रक्तपेशी, प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा. प्लाझ्मा हे रक्ताचा द्रव भाग आहे. ह्या प्लाझ्माच्या साहाय्याने, आवश्यकतेनुसार अँटीबॉडीज तयार केलं जातं.

रक्तातला प्लाझ्मा वेगळा काढून त्यावर अभ्यास सुरू आहे. हाच प्लाझ्मा आता इतर कोव्हिड रुग्णांचे जीव वाचवू शकणार आहे. कोरोना विषाणूला हरवून जी व्यक्ती बरी झाली आहे, त्या व्यक्तीचं रक्त आता इतर पेशंट्चे जीव वाचवू शकेल.

कसं शक्य आहे?

एखादा विषाणू शरीरात शिरला की आपलं शरीर त्याला हुसकावून लावण्यासाठी जोरदार प्रयत्न करतं. एका विशिष्ट विषाणूला मारण्यासाठी आपलं शरीर विशिष्ट प्रकारच्या अँटीबॉडीज तयार करतं. या अँटीबॉडीज आपल्या रक्तातल्या प्लाझ्मामध्ये असतात.

कोव्हिडमधून बऱ्या झालेल्या व्यक्तीच्या शरीरात कोरोनाशी लढू शकणाऱ्या अँटीबॉडीज मुबलक असतात. त्या काढून कोरोनाशी लढणाऱ्या एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या शरीरात सोडल्या तर मग त्या वृद्ध व्यक्तीचं शरीर कोरोनाशी चांगल्या पद्धतीनं दोन हात करू शकतं.


प्लाझ्मा कसं काम करतं? हे सांगण्यासाठी आम्ही एक व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओच्या मदतीनं आम्ही अँटीबॉडीज कसे कार्य करतात आणि कोरोना विषाणूचा प्रभावीपणे कसा सामना करता येईल हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही प्लाझ्मा दान करणाऱ्या लोकांशी संवाद साधला आहे. तीन वेळा प्लाझ्मा दान केल्यानंतर त्यांनी आपला अनुभव सामायिक केला आहे.


जुनी उपचार पद्धती

संसर्गजन्य रोगांवर उपचार म्हणून अनेक दशकांपासून प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात आहे. सार्स, मर्स तसंच H1N1 या साथीच्या रोगांवेळीही प्लाझ्मा थेरपीचा वापर केला गेला होता.

पहिल्या महायुद्धात 1918 मध्ये पसरलेल्या स्पॅनिश फ्लू पासून लोकांची सुटका करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात आला होता.

इबोला या आजाराचा संसर्ग झालेल्या रुग्णांकरता प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात आला होता. इबोलानं थैमान घातल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं प्लाझ्मा थेरपीबाबत मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केली होती.

कोरोना विषाणूवर लस निघालेली नाही. त्यासाठी वर्षभरापेक्षा जास्त काळ लागू शकतो. कोविडवर औषध नाही. त्यामुळे प्लाझ्मा थेरपीकडून अनेक शास्त्रज्ञ आणि सरकारांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.


हेही वाचा

मुंबईत १७९१ नवे रुग्ण, ४७ जणांचा दिवसभरात मृत्यू

मीरा भाईंदरमध्ये कोरोनाचे १३९ नवे रुग्ण, ५ जणांचा मृत्यू

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा