अफवा, खोट्या बातम्या, माहिती टाळण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपची ‘टिपलाइन’ सुविधा

अफवांना आळा घालण्यासाठी आणि खोट्या बातम्यांचा प्रसार टाळण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअ‍ॅपनं ‘टिपलाइन’ ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

SHARE

निवडणुकीच्या काळात सोशल मीडियावर बऱ्याच अफवा पसरविल्या जातात. तसंच, खोटी माहिती दिली जाते. त्यामुळं या अफवांना आळा घालण्यासाठी आणि खोट्या बातम्यांचा प्रसार टाळण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअ‍ॅपनं ‘टिपलाइन’ ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेर्तंगत नागरिकांना मिळालेल्या माहितीची सत्यता आणि विश्वासार्हता तपासता येणार आहे. प्रोटो या भारतीय स्टार्टअप कंपनीनं ही 'टिपलाइन' तयार केली असून मंगळवारपासून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. 


अफवांची तपासणी

व्हॉट्सअॅपवर आलेले खोटी माहिती देणारी छायाचित्रं, व्हिडीओ लिंक, बातम्या किंवा माहिती याबाबत शंका आल्यास त्याची सत्यता तपासण्यासाठी युजर्सना ती माहिती +९१-९६४३-०००-८८८ या क्रमांकावर पाठवायची आहे. त्यानंतर प्रोटो कंपनीच्या सेंटरमार्फत तिची सत्यता युजर्सला कळविण्यात येणार आहे. दरम्यान इंग्रजी, हिंदी, तेलुगू, बंगाली, मल्याळम या भाषांतच ही सुविधा वापरता येणार आहे. 


अफवा पसरविल्यानं मारहाण

मागील वर्षी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे अफवा पसरविण्यात आल्यानं देशात लोकांना मारहाण झाल्याचे प्रकार घडले होते. त्यानंतर, व्हॉट्सअ‍ॅपनं एक संदेश एकावेळी केवळ ५ जणांनाच पाठविण्याची व्यवस्था लागू केली होती. त्यामुळं निवडणुकांत मतदारांना प्रभाव पाडण्यासाठी अफवा व खोटी माहिती पसरवण्याचा प्रयत्न सोशल मीडियातून झाल्यास संबंधित कंपन्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा केंद्र सरकारनं दिला आहे.हेही वाचा -

आचार संहितेमुळं मांजरांची नसबंदी लांबणीवर

लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी ‘महामतदार जागृती’ अभियानसंबंधित विषय
ताज्या बातम्या