मुंबईतील पार्किंगचा प्रश्न सुटणार कधी ?

 Mumbai
मुंबईतील पार्किंगचा प्रश्न सुटणार कधी ?

मुंबई - मुंबईतील पार्किंगचा प्रश्न सुटावा यासाठी महापालिकेनं 33 (24) अंतर्गत विकासकांना मोफत एफएसआय देऊन त्याबदल्यात वाहनतळ उभे करून, ते महापालिकेच्या ताब्यात देण्याचं धोरण प्रशासनानं अवलंबलंय. मात्र या माध्यमातून उभे राहणारे वाहनतळ घेण्यासाठी प्रशासन उदासीन आहे. मुंबईभरातील विकासकांकडे सुमारे 46 हजार 366 वाहनांची जागा उपलब्ध असून त्यापैकी केवळ चार हजार 264 जागा ताब्यात घेण्यात महापालिकेला यश आलं. याबाबत बुधवारी झालेल्या सुधार समितीत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला.

Loading Comments