Advertisement

भायखळ्यातील राणीच्या बागेत येणार परदेशी प्राणी

मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयात विदेशी प्राण्यांचं अधिवास तयार करण्यात येणार आहे.

भायखळ्यातील राणीच्या बागेत येणार परदेशी प्राणी
SHARES

मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयात विदेशी प्राण्यांचं अधिवास तयार करण्यात येणार आहे. जिराफ, झेब्रा, पांढरा सिंह, जॅग्वार या प्राण्यांकरिता प्रदर्शनी तयार करण्यात येणार आहे. विविध कामं देखील हाती घेण्यात येणार आहेत. याकरिता ४९.६७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पाणमांजर, लांडगा, सांबर, कांकर, नीलगाय, चौशिंगा यांच्या पिंजऱ्यांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.

मार्च २०२१ पर्यंत पिंजऱ्याचे बांधकाम पूर्ण होणार आहे. इथं संकल्प उद्यान विकसित करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. येथील इंटरप्रिटेशन सेंटरच्या इमारतीमध्ये मुंबईतील विविध दर्शनीय ठिकाणं दर्शविणारी नवीन सुविधा विकसित करण्यात येत असून, विविध ठिकाणी आभासी फेरफटका मारता येणार आहे.

वरळी, विक्रोळी, अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम, मालाड, दहिसर येथील जलतरण तलाव बांधण्याची आणि संकुल उभारण्याची कामं प्रगतीपथावर आहेत.  यासाठी २० कोटी तरतूद आहे. दादर येथील जगन्नाथ शंकरशेठ फ्लायओव्हर खालील प्रस्तावित जागेचं सुशोभिकरणाचं काम प्रगतीपथावर आहे. सांताक्रूझ, वांद्रे, विक्रोळी, भांडूप, ओशिवरा, कांदिवली पूर्व, कुर्ला येथील उद्यानांच्या सुशोभिकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, काम पूर्ण झाल्यानंतर ही उद्यानं नागरिकांसाठी खुली करण्यात येणार आहे.

परळ, सायन कोळीवाडा, मालाड, पोईसर, कांदिवली, माटुंगा, कुर्ला, वांद्रे आणि घाटकोपर येथील मैदानांच्या विकासकामास सुरुवात करण्यात आली असून, ५३.२७ कोटी तरतूद करण्यात आली आहे. शिवाय नागरी वनीकरणामध्ये वाढ करण्यात येणार असून, २०.१५ कोटींची तरतूद आहे. एकूण १२६.५३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

पिंजऱ्याचे बांधकाम

पाणमांजर, लांडगा, सांबर, कांकर, नीलगाय, चौशिंगा यांच्या पिंजऱ्यांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. मार्च २०२१ पर्यंत ते पूर्ण होईल. संकल्प उद्यान विकसित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ही बाग अधिक रेखीव होणार आहे.



हेही वाचा -

मिठी नदीच्या कामाला आणखी वेग

एमयूटीपी प्रकल्पांसाठी केवळ 'इतक्या' कोटींचा अतिरिक्त निधी


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा