Advertisement

खिशाला खार! घाऊक महागाई ८ महिन्यांच्या उच्चांकी!!

नोव्हेंबर २०१७ मध्ये घाऊक मूल्य निर्देशांकावर आधारीत महागाई दर ३.९३ टक्क्यांवर आला आहे. तर आक्टोबरमध्ये महागाई दर ३.५९ टक्क्यांवर होता. या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच खार लागत आहे.

खिशाला खार! घाऊक महागाई ८ महिन्यांच्या उच्चांकी!!
SHARES

भाज्या, अन्नधान्याचे दर सातत्याने वाढत असल्याने नोव्हेंबरमध्ये घाऊक महागाईने ८ महिन्यांचा उच्चांक गाठला आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये घाऊक मूल्य निर्देशांकावर आधारीत महागाई दर ३.९३ टक्क्यांवर आला आहे. तर आक्टोबरमध्ये महागाई दर ३.५९ टक्क्यांवर होता. या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच खार लागत आहे.


खाद्य महागाईतही वाढ

खाद्य महागाईतही नोव्हेंबरमध्ये वाढ बघायला मिळत आहे. आक्टोबरमध्ये खाद्य महागाई दर ३.२३ टक्के होता. तर नोव्हेंबर महिन्यांत खाद्य महागाई दर वाढून ४.१० टक्क्यांवर पोहोचला आहे. भाज्या आणि खाद्य पदार्थांचे दर वाढल्याने खाद्य महागाईत भर पडली आहे. मात्र या महिन्याभरात डाळींच्या किंमतीमध्ये थोडीफार घसरण झाली आहे.



आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढत असताना देशातही एलपीजी, पेट्रोल, डिझेल, रॅकेल या इंधनाचे दर वाढत आहे. परिणामी विजेच्या दरातही वाढ झाली आहे.


आरबीआयचा अंदाज खरा

द्विमासिक पतधोरणाचा आढावा घेताना रिझर्व्ह बँके (आरबीआय) ने महागाईत वाढ होण्याचा अंदाज वर्तवला होता. या अंदाजानुसार इंधनासोबतच अन्नधान्याच्या किंमतीमध्ये वाढ होताना दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते महागाईचा हा कल पुढील काही दिवस असाच राहण्याची शक्यता आहे.



हेही वाचा-

स्वस्त कर्जासाठी आणखी प्रतिक्षा, रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात व्याजदर स्थिर

क्रूड आॅईलने गाठला अडीच वर्षांतला उच्चांक, पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार?


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा