Advertisement

कच्च्या रस्त्यामुळे रहिवासी हैराण


कच्च्या रस्त्यामुळे रहिवासी हैराण
SHARES

मानखुर्द - जनतानगर अजमेरी रस्त्याची दुरवस्था झालीय. कच्च्या रस्त्यामुळे इथले रहिवासी त्रस्त झाले आहेत. पावसाळ्यात इतका चिखल होतो की, या रस्त्यावर पाय ठेवणंही मुश्कील होऊन बसतं. याविषयी स्थानिक मोहम्मद शफी चौधरी यांनी सांगितलं की, अनेकदा तक्रार देऊनही पालिका आणि नगरसेवक या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे आम्हीच तात्पुरता रस्ता बनवलाय. तर हा रस्ता जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारितल्या जागेत आहे. त्यामुळे त्यांच्या परवानगीशिवाय महापालिका काहीच करू शकत नसल्याचं नगरसेवक शांताराम पाटील यांनी सांगितलंय. स्थानिक आमदार अबू असीम आझमी यांच्या फंडातून हा रस्ता करण्यासही सुचवलं आहे. पण त्यावर निर्णय झालेला नाही. दरम्यान, या संदर्भात आझमी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा