Advertisement

महाराष्ट्रात थंडीची चाहूल

मुंबईतील तापमानातही घट झाली आहे.

महाराष्ट्रात थंडीची चाहूल
SHARES

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे (cold wind) उत्तर महाराष्ट्रातील (maharashtra) किमान तापमान 15 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. नाशिकमध्ये शुक्रवार, 8 नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्वात कमी 14.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस उत्तर महाराष्ट्रात थंडी (winter) कायम राहण्याचा अंदाज आहे.

राज्यात उत्तरेकडून थंड वारे येत आहेत. त्यामुळे प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात घट झाली आहे. नाशिकमध्ये शुक्रवारी राज्यातील सर्वात कमी 14.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

नाशिक शहरात 15.7 अंश सेल्सिअस, जळगावात 15.7 अंश सेल्सिअस, महाबळेश्वरमध्ये 15.2 अंश सेल्सिअस आणि पुण्यात 16.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रवाह पुढील पाच दिवस कायम राहण्याचा अंदाज असल्याने, पुढील पाच ते सहा दिवस प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रात थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे.

राज्याच्या इतर भागातही थंडी वाढली आहे. मराठवाड्यात 16.5 ते 18 अंश सेल्सिअस, विदर्भात 17.5 ते 19.5 अंश सेल्सिअस आणि किनारपट्टी भागात 19.6 ते 25 अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमानाची नोंद झाली आहे.

शुक्रवारी कुलाब्याचे किमान तापमान 25.2 अंश सेल्सिअस तर सांताक्रूझचे किमान तापमान 22.0 अंश सेल्सिअस नोंदले गेले. दरम्यान, पुढील आठवडाभर राज्यात कुठेही पाऊस पडण्याची शक्यता नाही. कमाल तापमानातही घट होणार असून, राज्यभरात किमान तापमानातही घट झाली आहे.

किनारपट्टीवर कमाल तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअस, मराठवाड्यात 30 आणि 32 अंश सेल्सिअस, मध्य महाराष्ट्रात 31 आणि 34 अंश सेल्सिअस आणि विदर्भात 31 आणि 33 अंश सेल्सिअस होते. मुंबईच्या (mumbai) कमाल तापमानात फारशी घट झाली नसली तरी हवेतील आर्द्रता कमी झाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.



हेही वाचा

मुंबईत प्रथम नमो भारत रॅपिड रेल्वेची ट्रायल रन

विधानसभा निवडणूक: प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा