Advertisement

पालिका रुग्णालयाने उपचार नाकारल्याने महिलेची लोकलमध्ये प्रसूती

२५ ऑक्टोबर रोजी महापालिका रुग्णालयाने गर्भवती महिलेला दाखल करून घेण्यास नकार दिल्यानंतर त्या महिलेची मुंबईच्या लोकलमध्ये प्रसूती झाल्याची घडना उघडकीस आली आहे. पीडित महिलेचं नाव सुरेखा तिवारी (२६) असं आहे. पती कामगार असल्याने रुग्णालयाने महिलेला उपचार देण्यास नकार दिल्याची माहिती मिळते.

पालिका रुग्णालयाने उपचार नाकारल्याने महिलेची लोकलमध्ये प्रसूती
SHARES

मुंबईतील महापालिका रुग्णालयाने गर्भवती महिलेला दाखल करून घेण्यास नकार दिल्यानंतर त्या महिलेची मुंबईच्या लोकलमध्ये प्रसूती झाल्याची घडना उघडकीस आली आहे. २५ ऑक्टोबर रोजीची ही घटना आहे. पीडित महिलेचं नाव सुरेखा तिवारी (२६) असं आहे. पती कामगार असल्याने रुग्णालयाने महिलेला उपचार देण्यास नकार दिल्याची माहिती मिळते.


दोन रुग्णालयाने उपचार नाकारला

पीडित महिला आणि तिचा पती सुशील तिवारी हे दोघे २५ ऑक्टोबर रोजी भाईंदर येथील ठेंभा पालिका या रुग्णालयात उपचारासाठी गेले होते. त्यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांनी काही गोळ्या दिल्या आणि त्यांना कांदिवलीतील पालिकेच्या शताब्दी रुग्णालयात जाण्यास सांगितले. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ते तिथेही गेले. मात्र केसपेपर नसल्याचं कारण देत शताब्दी रुग्णालयातील नर्सने सुरेखाला दाखल करून घेण्यास नकार दिला.


सुशील तिवारींचा आरोप

सुरेखाला प्रसूती वेदना सुरू झाल्या. तरीही भाईंदरला जावून केसपेपर आणले. रुग्णालयाला हवी असलेली सर्व कागदपत्रे आणल्यानंतरही डॉक्टरांनी पत्नीला दाखल करून न घेता उलट नायर रुग्णालयात जाण्यास सांगितले, असा आरोप सुशील तिवारी यांनी केला आहे.
पत्नीला असह्य वेदना होत होत्या. त्यामुळे ट्रॅफिकमध्ये न अडकण्यासाठी टॅक्सीऐवजी लोकलने जाण्याचा निर्णय घेतला. दादर स्टेशनजवळ येत असताना पत्नीला प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि दुपारी १ च्या सुमारास सुरेखाने मुलाला जन्म दिला.

प्रसूती झाल्यानंतर सहप्रवाशांनी मदत करत आम्हाला केईएम रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्याच अवस्थेत नवजात बाळाला घेवून केईएम रुग्णालय गाठले, असंही तिवारी यांनी सांगितलं.

सध्या बाळाला अतिदक्षता विभागता ठेवण्यात आलं असून बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टारांनी दिली आहे. हा प्रकार गंभीर असून पालिकेने चौकशीचे आदेश दिल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.


हेही वाचा - 

उडत्या विमानात महिलेची प्रसुती

नालासोपारा रेल्वे ब्रिजवर महिलेने दिला बाळाला जन्म

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा