खड्डा खणला, काम कधी?

 Mumbai A 73
खड्डा खणला, काम कधी?
खड्डा खणला, काम कधी?
See all

चेंबूर - पालिकेने ड्रेनेज लाइनसाठी घाटला गाव परिसरातील कुणबी समाज हॉलजवळ रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा खणला आहे. गेल्या आठ दिवसांपासून हा खड्डा खणून ठेवल्याने इथल्या रहिवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याच परिसरात तीन शाळा आहेत. त्यामुळे सकाळी दुपारी आणि संध्याकाळी शाळेच्या वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र हा खड्डा खणून ठेवल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. याबाबत पालिकेकडे तक्रार करून देखील पालिकेचा एकही कर्मचारी दोन दिवसात याठिकाणी फिरकला नसल्याचं इथले रहिवासी महेश अनुभव यांनी सांगितलं.

Loading Comments