Advertisement

मजासवाडी पोलिस वसाहतीत दुरूस्तीच्या नावे मलमपट्टी; कंत्राटदाराच्या मुसक्या आवळल्या

इमारतीची आणि सदनिकेची रंगरंगोटी, अंतर्गत जलवाहिनी आणि सॅनिटरी पाईप्स बसवणे अशीही दुरूस्ती करण्यात येत आहे. दुरूस्तीचं काम सुरू असतानाच रहिवाशी मात्र या दुरूस्तीवर नाखुश असल्याचं समोर आलं आहे.

मजासवाडी पोलिस वसाहतीत दुरूस्तीच्या नावे मलमपट्टी; कंत्राटदाराच्या मुसक्या आवळल्या
SHARES

जोगेश्वरी मजासवाडी येथील पोलिस वसाहतीतील १३ इमारतींची दुरूस्ती सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहे. मात्र, प्रत्यक्षात दुरूस्तीच्या नावाखाली फक्त मलमपट्टी केली जात असल्याची, दुरूस्ती निकृष्ट दर्जाची होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण राज्यमंत्री यांनी गुरूवारी दुरूस्तीच्या कामाचा आढावा घेतला असून निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या मुसक्या आवळण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. कंत्राटदाराच्या कामाचा एकही रूपया देऊ नये, बिल अदा करू असे निर्देश दिले आहेत. तर सार्वजनिक बांधकाम विभागास दोषी अधिकाऱ्याची चौकशी करत त्यासंबंधीचा अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.



८ कोटी मंजूर

मजासवाडी पोलिस वसाहतीत १३ इमारती आहेत. एका इमारतीत ८३ प्रमाणे एकूण १०७९ सदनिका असून या इमारतींची पुरती दुरावस्था झाली आहे. मुंबईकरांचं संरक्षण करणाऱ्या पोलिसांना आणि त्यांच्या कुटुंबांना जीव मुठीत घेऊन अशा जीर्ण इमारतीत रहावं लागत आहे. मजासवाडीच नव्हे तर मुंबईतील सर्वच पोलिस वसाहतींची हीच अवस्था असल्यानं पोलिसांच्याच सुरक्षितेचा प्रश्न एेरणीवर आला आहे. या मजासवाडी पोलिस वसाहतींच्या दुरूस्तीचं काम सार्वजनिक बांधकाम विभागानं हाती घेतलं आहे. त्यासाठी ८ कोटी २८ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार दुरूस्तीचं काम सुरू आहे.


निकृष्ट दर्जाचं काम

इमारतीच्या दुरूस्तीसह सदनिकेतील स्वयंपाकघर, शौचालय, स्नानगृह, स्लॅब, गळती, फरशी, दरवाजे, खिडक्या अशी सर्व प्रकारची दुरूस्ती करण्यात येत आहे. तर इमारतीची आणि सदनिकेची  रंगरंगोटी, अंतर्गत जलवाहिनी आणि सॅनिटरी पाईप्स बसवणे अशीही दुरूस्ती करण्यात येत आहे. दुरूस्तीचं काम सुरू असतानाच रहिवाशी मात्र या दुरूस्तीवर नाखुश असल्याचं समोर आलं आहे. दुरूस्ती योग्य प्रकारे होत नसून निकृष्ट दर्जाचं काम होत असल्याच्या अनेक तक्रारी वायकर यांच्याकडे आल्या होत्या.

बिल देऊ नका

या तक्रारींची दखल घेत वायकर यांनी गुरूवारी प्रत्यक्ष कामाची पाहणी केली असता काम निकृष्ट दर्जाचं असल्याचं स्पष्ट झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यानुसार वायकर यांनी सर्व रहिवाशांना आपल्या तक्रारी लिखीत स्वरूपात लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तर कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना खडसावत काम योग्य प्रकारे करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचवेळी आतापर्यंत जे काही काम केलं त्या कामाच्या बिलाचा एक रूपयाही अदा करू नये, असंही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगितलं आहे. जोपर्यंत रहिवाशांचं समाधान होत नाही तोपर्यंत बिल अदा करू नये असंही त्यांनी सांगितलं आहे. 



हेही वाचा - 

टीबी रुग्णालयातील नर्स अचानक संपावर

चोरट्या प्रवाशांमुळे रेल्वेचं ४ हजार कोटींचं नुकसान





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा