Advertisement

टीबी रुग्णालयातील नर्स अचानक संपावर

शिवडी टीबी रुग्णालयातील परिचारिकांनी गुरुवारी सकाळपासून अचानक कामबंद आंदोलन पुकारल्याने रुग्णसेवेवर चांगलाच परिणाम झाला. मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी केलेल्या निलंबनाच्या कारवाईविरोधात परिचारिकांनी हे आंदोलन पुकारलं आहे.

टीबी रुग्णालयातील नर्स अचानक संपावर
SHARES

मुंबईच्या शिवडी टीबी रुग्णालयातील परिचारिकांनी गुरुवारी सकाळपासून अचानक कामबंद आंदोलन पुकारल्याने रुग्णसेवेवर चांगलाच परिणाम झाला. मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी केलेल्या निलंबनाच्या कारवाईविरोधात परिचारिकांनी हे आंदोलन पुकारलं आहे. या आंदोलनामुळे टीबी रुग्णालयातील रुग्णाचे हाल होत आहेत.


कारण काय?

काही दिवसांपूर्वी शिवडीच्या टीबी हॉस्पिटलमधून टीबीच्या उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांसह बाहेर काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या विरोधात रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आय.ए.कुंदन यांनी काही दिवसांपूर्वी शिस्तभंगाची कारवाई करत एका परिचारिकेला निलंबित केलं होत. तर ३ परिचारिकांची बदली करण्यात आली होती. या विरोधात सर्व परिचारिकांनी गुरूवारी सकाळपासून अचानक आंदोलन सुरू केलं.


परिचारिकांवर 'मेस्मा'

रुग्णालयातील सर्व परिचारिकांनी कामबंद आंदोलन केल्याने रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी डॉक्टरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नुकताच वैद्यकीय शिक्षण विभागानं आरोग्य व्यवस्था पुरवणाऱ्यांवर 'मेस्मा' लावण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच या निर्णयाची अंमलबजवाणी करण्यात येणार असून या निर्णयानंतर डॉक्टर, परिचारिका किंवा सरकारी रूग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या संपावर जाता येणार नाही.


घडलेल्या प्रकाराविरोधत महापालिका आतिरिक्त आयुक्तांनी परिचारिकांवर निलंबनाची कारवाई केली होती. या कारवाई विरोधात परिचारिका संपावर गेल्या असून रुग्णालयात रुग्णांकडे पाहाण्यासाठी कोणीही नाही. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णाचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे.
- डॉ. ललित आनंदे, वैद्यकीय अधिक्षक, टीबी रुग्णालय



हेही वाचा-

राज्यात सरकारी डॉक्टरांवर पुन्हा लागणार ‘मेस्मा’

शताब्दी रुग्णालयात परिचारिकांचं ठिय्या आंदोलन



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा