Advertisement

शताब्दी रुग्णालयात परिचारिकांचं ठिय्या आंदोलन


शताब्दी रुग्णालयात परिचारिकांचं ठिय्या आंदोलन
SHARES

कर्मचाऱ्यांचा तुटवडा, रिक्त पदं न भरणं, प्रयोगशाळांमध्ये डाॅक्टरांची उपस्थिती यांसारख्या विविध मागण्यांसाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयातील परिचारिकांनी रुग्णालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन पुकारलं आहे.




कर्मचाऱ्यांवर कामाचा भार

शताब्दी रुग्णालयात डॉक्टरांसह अनेक कर्मचाऱ्यांची कमरता असल्यान रुग्णांना योग्य उपचार मिळत नाहीत. त्याशिवाय रुग्णालयातील अनेक पदं रिक्त असल्यानं त्याचा भार अन्य कर्मचाऱ्यावर पडतो. त्यामुळं रुग्णालय प्रशासनानं नेमून दिलेली रिक्त पदं तातडीनं भरावी या मागणीसाठी पारिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं.




यंत्रणा कुचकामी

इतकंच नव्हे, तर रुग्णालयात वैद्यकीय चाचण्यांसाठी असलेल्या यंत्रणाही कुचकामी असल्यानं कित्येकदा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर फक्त प्रथमोपचार करून त्याला उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात पाठवलं जातं. यामुळं रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.


शताब्दी रुग्णालयात कर्मचारी वर्गाचा तुटवडा असल्यानं अन्य कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाला भर उचलावा लागत असून याकरिता परिचारिकांनी ठिय्या आंदोलन पुकारलं आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी लवकरच एक विशेष बैठक घेण्यात येणार असून त्यात त्यांच्या समस्या सोडण्याचा प्रयत्न करणार आहोत.
- डॉ. प्रदीप आंग्रे, वैद्यकीय अधिक्षक, शताब्दी रुग्णालय



हेही वाचा-

पोलिओ लसीत व्हायरस: घाबरू नका, ११ सप्टेंबरपासून लस बंद- आरोग्यमंत्री

प्रसुतींची आकडेवारी दाखवणं खासगी रुग्णालयांना बंधनकारक?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा