Advertisement

प्रसुतींची आकडेवारी दाखवणं खासगी रुग्णालयांना बंधनकारक?


प्रसुतींची आकडेवारी दाखवणं खासगी रुग्णालयांना बंधनकारक?
SHARES

मुंबईतील बहुतांशी खासगी नर्सिंग होम्समध्ये प्रसुतीकरीता दाखल होणाऱ्या महिलांची नैसर्गिक प्रसुती ऐवजी शस्त्रक्रिया करून (सिझरिंग) प्रसुती केली जात असल्याने या प्रसुतीगृहांमधील नैसर्गिक आणि शस्त्रक्रिया केलेल्या प्रसुतींची माहिती देणं रुग्णालयांना बंधनकारक करण्यात यावं, अशी मागणी होत आहे. ही माहिती मिळाल्यास शहरात किती नैसर्गिक प्रसुती आणि किती प्रसुती शस्त्रक्रियेद्वारे होतात, हे कळू शकेल.


दर्शनी भागात आकडेवारी

मुंबईतील प्रत्येक खासगी नर्सिंग होम आणि प्रसुतीगृहांना त्यांच्या दर्शनी भागात नैसर्गिकरित्या व शस्त्रक्रियेद्वारे होणाऱ्या प्रसुतींची आकडेवारी प्रदर्शित करणं बंधनकारक करण्यात यावं, अशी मागणी शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. सध्या प्रत्येक खासगी प्रसुतीगृहांमध्ये नैसर्गिकरित्या होणाऱ्या प्रसुतींच्या तुलनेत शस्त्रक्रियेद्वारे होणाऱ्या प्रसुतींच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे आणि ही बाब राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात आढळून आली आहे.


नैसर्गिक प्रसुतीकडे कल

वास्तविक शस्त्रक्रियेद्वारे होणाऱ्या प्रसुतींमध्ये स्त्रीचा मृत्यू होण्याची शक्यता अधिक असणे, भविष्यात गर्भधारणा होण्यास गुंतागुंतीचा धोका निर्माण होणे, संसर्ग होणे, कायमस्वरुपी आरोग्यविषयक व्याधी उत्पन्न होणे, इत्यादी दुष्पपरिणाम होण्याची शक्यता असल्याने अनेक गर्भवतींचा नैसर्गिकरित्या प्रसुती होण्याकडे अधिक कल असतो.

मात्र शस्त्रक्रियांद्वारे होणारुया प्रसुतींमधून अधिक आर्थिक लाभ होत असल्यामुळे तसंच नैसर्गिकरित्या प्रसुतीकरता आवश्यक असलेले अनुभवी आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी नसल्याने गेल्या काही वर्षांमध्ये शस्त्रक्रियेद्वारे प्रसुती करण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचं पेडणेकर यांनी म्हटलं आहे.हेही वाचा-

‘प्रजा’च्या प्रगतीपुस्तकात नगरसेविका टॉपवर

महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवाशांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकीसंबंधित विषय
Advertisement