Advertisement

महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवाशांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकी

महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेनं स्वतंत्र तिकीट खिडकी सुरू केली आहे. पुढील सहा महिने या स्वतंत्र तिकीट खिडकीची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी होणार आहे.

महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवाशांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकी
SHARES

तिकीट काढण्यासाठी रेल्वे स्थानकातील एकाच तिकीट खिडकीसमोर प्रवाशांना मोठ्या रांगेत उभं रहावं लागतं. त्यामुळे जेष्ठ नागरिक तसंच दिव्यांग प्रवाशांचे चांगलेच हाल होतात. मात्र, अाता या प्रवाशांना तिकिटासाठी भल्यामोठ्या रांगेत उभं रहावं लागणार नाही. महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेनं स्वतंत्र तिकीट खिडकी सुरू केली आहे. पुढील सहा महिने या स्वतंत्र तिकीट खिडकीची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी होणार आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून ही खिडकी कायमस्वरुपी करण्यात येणार आहे.


११ स्थानकांवर

पश्चिम रेल्वे मार्गावरील महत्वाच्या ११ रेल्वे स्थानकांवर महिलांसह ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांसाठी १३ स्वतंत्र तिकीट खिडकी सुरू करण्यात आली आहे. तसंच, मासिक पासधारकांसाठी पश्चिम रेल्वेच्या २५ तिकीट खिडक्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत.


पासधारकांसाठीही खिडकी

पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी, गोरेगाव, मालाड, बोरीवली, वसई रोड आणि सूरत या स्थानकांवर स्वतंत्र तिकीट खिडकी सुरू करण्यात आली आहे. तर, चर्चगेट, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल, लोअर परेल, प्रभादेवी, दादर, माहिम, वांद्रे, खार, सांताक्रूज, विले पार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवली, मिरारोड, भाईंदर, वसई रोड, नालासोपारा आणि विरार या स्थानकांवर मासिक पासधारकांसाठी तिकीट खिडक्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत.



हेही वाचा -

मध्य रेल्वे मार्गावर विशेष ब्लॉक

कारमध्ये मागे बसताना सीट बेल्ट जरूर लावा, नाहीतर...




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा