Advertisement

मुंबई जगातलं १६ वं सर्वांत महागडं शहर

स्वप्नांची नगरी ‘मुंबई’ आज जगातलं १६ वं महागडं शहर ठरलं आहे. नाईट फ्रँकने नुकत्याच सादर केलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.

मुंबई जगातलं १६ वं सर्वांत महागडं शहर
SHARES

स्वप्नांची नगरी अशी खऱ्या अर्थानं मुंबईची ओळख. पण ही स्वप्नांची नगरी ‘मुंबई’ आज जगातलं १६ वं महागडं शहर ठरलं आहे. नाईट फ्रँकने नुकत्याच सादर केलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.


काय म्हटलंय अहवालात ?

प्राईम रेसिडेंन्शीयल मार्केटच्या टॉप २० शहरांच्या लिस्टमध्ये मुंबई हे भारतील एकमेव महागडं शहर असल्याचं नाईट फ्रँकच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. मुंबईत १० लाख डॉलर्समध्ये केवळ १०० चौरस मीटरचा प्लॉट खरेदी करता येऊ शकतो. रूपयांमध्ये याची किंमत पाहिल्यास मुंबईत १०० चौरस मीटरचा प्लॉट खरेदी करण्यासाठी मुंबईत ७ कोटी रूपये मोजावे लागतात.


०.३ टक्क्यांची वृद्धी

२०१८ साली मुंबईतील मालमत्तांच्या किंमतीत ०.३ टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मोनो, मेट्रो, एसी लोकल यांसारख्या पायाभूत सुविधांची भर पडत असल्यामुळे मालमत्तांच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. तसंच रहिवासी मालमत्तांच्या किंमतीच्या वाढीचा विचार केला तर यामध्ये सध्या मुंबई ६७ व्या स्थानावर आहे.


१२ वं श्रीमंत शहर

मुंबई शहर हे १६ वं महागडं शहर ठरलं असून नुकताचं नाइट फ्रॅंक या संस्थेनं जागतिक श्रीमंती अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालात यावर्षी मुंबई शहर जगातलं १२ वं सगळ्यात श्रीमंत ठरलं आहे. गेल्यावर्षी श्रीमंत शहरांच्या यादीत मुंबई शहर १८ व्या स्थानावर होतंजगात वाढलेली श्रीमंतांची संख्या, शहरांमध्ये होणारे बदल या सर्वाचा अभ्यास करून हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालामध्ये २२५ कोटी किंवा त्याहून अधिक गुंतवणूक क्षमता ठेवणाऱ्या लोकांना ,कंपन्यांना सर्वाधिक श्रीमंतीचा स्तर दिला असून त्यांना 'अल्ट्राबिलेनियर' म्हटलं आहे. त्यानुसार, भारतात एकूण १९४७ अल्ट्राबिलेनियर आहेत, तर यामधील सर्वाधिक ७९७ 'अल्ट्राबिलिनियर' मुंबईत आहेत. अल्ट्राबिलिनियरच्या संख्येत मागील काही वर्षांत वाढ झाली असून, येत्या काळात अल्ट्राबिलिनियर्सची संख्या ३९ टक्क्यांनी वाढणार अशल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.




हेही वाचा - 

अडीच तासांच्या खोळंब्यानंतर पंचवटी एक्सप्रेस रवाना

आगीशी खेळल्यानं ट्विंकलची अक्षयला धमकी!




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा