Advertisement

पश्चिम रेल्वेवरील 6 लोकल ट्रेन्सच्या वेळेत बदल, पहा वेळापत्रक

हा बदल 4 जानेवारीपासून लागू झाला आहे.

पश्चिम रेल्वेवरील 6 लोकल ट्रेन्सच्या वेळेत बदल, पहा वेळापत्रक
SHARES

पश्चिम रेल्वे (WR)च्या मुंबई विभागाने काही उपनगरीय लोकल ट्रेनच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. वेळेत काही मिनिटांनी बदल करण्यात आला आहे. हा बदल 4 जानेवारीपासून लागू झाला आहे.

WR चे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, ज्या गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत त्या खालीलप्रमाणे आहेत:

1. विरार - चर्चगेट लोकल

लोकल सुटण्याची जुनी वेळ : 08.01 वा.

विरारहून लोकल सुटण्याची नवी वेळ : 07.55 वा. 

2. विरार - चर्चगेट एसी लोकल

लोकल सुटण्याची जुनी वेळ : 07.56 वा.

विरारहून लोकल सुटण्याची नवीन वेळ : 07.59 वा.

3. चर्चगेट – विरार लोकल

लोकल सुटण्याची जुनी वेळ : 06.40 वा.

चर्चगेटहून लोकल सुटण्याची नवीन वेळ: 06.32 वा.

4. चर्चगेट – बोरिवली लोकल

लोकल सुटण्याची जुनी वेळ : 09.27 वा.

चर्चगेटहून लोकल सुटण्याची नवीन वेळ : 09.19 वा.

5. चर्चगेट – विरार एसी लोकल

लोकल सुटण्याची जुनी वेळ : 09.19 वा.

चर्चगेटहून लोकल सुटण्याची नवीन वेळ : 09.23 वा.

6. चर्चगेट – बोरिवली एसी लोकल

लोकल सुटण्याची जुनी वेळ : 09.24 वा.

चर्चगेटहून लोकल सुटण्याची नवीन वेळ : 09.27 वा.


प्रवाशांनी वरील बदलांची कृपया नोंद घ्यावी ही विनंती.



हेही वाचा

अयोध्या ते मुंबई थेट विमानसेवा

मुंबई मेट्रो 3: एक्वा लाइनचा पहिला टप्पा 2024 च्या सुरुवातीला सुरू होणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा