Advertisement

माता व बालक रुग्णालयातील एक्स-रे विभाग एक महिन्यानंतरही बंदच


माता व बालक रुग्णालयातील एक्स-रे विभाग एक महिन्यानंतरही बंदच
SHARES

बोरीवली इथल्या मागाठणे परिसरात असलेल्या ‘माता व बालक’ या पालिकेच्या रुग्णालयातील एक्स-रे विभाग एका महिन्यात सुरू करण्यात येईल, असा दावा रुग्णालयाकडून करण्यात आला होता. पण, एक महिना उलटून गेला तरी या रुग्णालयातील एक्स-रे विभाग बंदच असल्याचं समोर आलंय. त्यामुळे इथे प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांना एक्स-रे काढण्यासाठी शताब्दी किंवा आंबेडकर रुग्णालयात जावं लागतंय. दिवसाला जवळपास ओपीडीसाठी 50 ते 60 महिला रुग्णालयात येतात.याविषयी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी अनिल चोपडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लवकरच हा विभाग सुरू करणार असल्याचं सांगितलं. पण, या विभागासाठी लागणारा अनुभवी टेक्निशियन शोधण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही कंपन्यांना टेक्निशियनसाठी प्रस्तावही पाठवण्यात आला आहे. पण, अजूनही तिथून काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुढचे काही दिवस तरी एक्स-रे विभाग अनुभवी टेक्निशियन मिळेपर्यंत बंद राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. टेक्निशियनच्या कामावर लगेच कुठल्याही व्यक्तीला ठेवता येत नाही. योग्य व्यक्तीच ते काम करू शकते. त्यामुळे लवकरच टेक्नीशियन व्यक्ती या कामावर रुजू होईल. जेणेकरुन इथे येणाऱ्या महिलांची गैरसोय होणार नाही.

मागाठणेपासून शताब्दी रुग्णालयात येण्यासाठी 15 मिनिटे लागतात. त्यामुळे आमची मोठी दगदग होते, असं माता व बालक रुग्णालयातून शताब्दी रुग्णालयात एक्स-रे काढण्यासाठी आलेल्या महिलांनी सांगितलं. त्यामुळे लवकरात लवकर या रुग्णालयातील एक्स-रे विभाग सुरू करावा अशी मागणी देखील काही महिलांनी केलीय.

हेही वाचा - बोरिवलीत गरोदर महिलांची पायपीट, रुग्णालयात एक्स-रे मशीनच बंद

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा