Advertisement

'या' एक्स-रे कक्षाला वाली कोण?


'या' एक्स-रे कक्षाला वाली कोण?
SHARES

एखादा तंत्रज्ञ गैरहजर असल्यास तो हाताळत असलेला संपूर्ण विभागच बंद करण्याचा प्रकार तुम्ही कधी पाहिला आहे का? पाहिला नसेल तर बोरीवलीतील मागाठणे परिसरातील ‘माता व बालक’ महापालिका रुग्णालयातला एक्स-रे विभाग पाहा.


दावा फोल

या विभागातील तंत्रज्ञ आजारपणामुळे गैरहजर आहे. त्यामुळे हा विभाग मागील 4 महिन्यांपासून बंद ठेवण्यात आला आहे. हा विभाग एका महिन्यात सुरू करण्याचा दावा रुग्णालयाने केला होता. पण, 4 महिने झाले तरी रुग्णालयातला एक्स-रे विभाग बंदच आहे.


महिलांना त्रास

उल्लेखनीय बाब म्हणजे या कक्षातील तंत्रज्ञाची प्रकृती 4 महिन्यांपासून ठीक नसल्याचे कारण रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी अनिल चोपडे देत आहेत. हा कक्ष बंद असल्याने इथे येणाऱ्या महिलांना नाईलाजाने एक्स-रे काढण्यासाठी दुसऱ्या रुग्णालयात जावे लागत आहे.



शताब्दीचा आधार

दिवसाला जवळपास 50 ते 60 महिला या रुग्णालयात उपचारासाठी येतात. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास या महिलांना कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात एक्स-रे साठी पाठवण्यात येते किंवा 108 नंबरला फोन करुन रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात पाठवले जाते.

महापालिकेसोबत झालेल्या करारानुसार 'डीएस इंटरप्राईजेस' या कंपनीकडून 'माता व बालक’ रुग्णालयात अनुभवी तंत्रज्ञ मागवले जातात. पण, कंपनीकडे देखील एक्स-रे कक्षात हवा तसा माणूस उपलब्ध नसल्याने रुग्णालय प्रशासनाची अडचण झाली आहे.


मागच्या 4 महिन्यांपासून एक्स-रे विभाग बंदच आहे. हा विभाग सांभाळत असलेल्या तंत्रज्ञाला क्षयरोग झाल्याने तो गैरहजर आहे. पुढील 2 महिने तरी हा तंत्रज्ञ येण्याची शक्यता नाही. त्यामुळे एक्स-रे कक्ष बंदच राहणार आहे. याविषयी आम्ही महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी पद्मजा केसकर यांच्याशी देखील बोललो आहोत. त्या देखील रुग्णालयाला नवीन एक्स-रे तंत्रज्ञ मिळवून देण्याच्या प्रयत्नात आहेत.


- डॉ. अनिल चोपडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, माता व बालक रुग्णालय




हे देखील वाचा -

भांडुपमधील प्रस्तावित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल रद्द


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा