Advertisement

गोरेगावमध्येही झाड कोसळून तरुणाचा मृत्यू

मुंबईत मुसळधार पावसामुळे झाडे कोसळून दुर्घटना घडण्याची ही आज दिवसभरातील दुसरी घटना आहे

गोरेगावमध्येही झाड कोसळून तरुणाचा मृत्यू
SHARES

मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेकडील एमजी रोड परिसरात देखील मुसळधार पावसामुळे एक वृक्ष घरावर कोसळल्याची दुर्घटना घडली. यात एका तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. प्रेमलाल निर्मल असे तरुणाचे नाव आहे. वृक्ष कोसळून व्यक्तींचा मृत्यू होण्याची आज दिवसभरातील ही दुसरी घटना आहे.

दुपारच्या सुमारास गोरेगाव एमजी रोड परिसरातील मिठा नगर महापालिका कॉलनीतील एका घरावर वृक्ष कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत बी/22 ए या घरात राहणाऱ्या तीस वर्षीय तरुणाला गंभीर दुखापत झाली. (Rain Update News)

शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी गंभीर जखमी अवस्थेतील प्रेम लाल निर्मल याला जवळच्या प्रार्थना रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून गोरेगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.

मुंबईत मुसळधार पावसामुळे झाडे कोसळून दुर्घटना घडण्याची ही आज दिवसभरातील दुसरी घटना आहे आज पहाटे देखील मालाड पश्चिमेकडील मामलेदार वाडी परिसरात कौशल महेंद्र जोशी या 33 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.हेही वाचा

शनिवारपासून मुंबईत १० टक्के पाणीकपात

मुंबईच्या मुसळधार पाऊस, मालाडमध्ये झाड कोसळून एकाचा मृत्यू

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा