सर्वसामान्यांचा वाली कोण?

गिरगाव - मुंबई स्वप्नांची नगरी. याच स्वप्न नगरीतलं महत्त्वाचं ठिकाण म्हणजे गिरगाव. या गिरगावात अनेक उंच उंच इमारतीचे टॉवर आपल्याला पाहायला मिळतात. मात्र गिरगावातील झावबावाडी परिसरातील रहिवासी सध्या भितीच्या सावटाखाली जगतायेत.

मुंबई स्वप्नांची नगरी. याच स्वप्न नगरीतलं महत्त्वाचं ठिकाण म्हणजे गिरगाव.

झावबावाडीतील पार्वती बिल्डिंगचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आणि त्याचे हादरे त्याच परिसरातील 100 वर्षांपूर्वी जुन्या इमारतींना बसतोय. याबाबत पालिका अभियंत्यांना तक्रारही केली मात्र त्यांनीही दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे पालिक अधिकारी नेमके कुणासाठी सर्वसामान्यांसाठी की विकासकांसाठी असा प्रश्न निर्माण झालाय.

Loading Comments