• शेतातली भाजी ताटात
  • शेतातली भाजी ताटात
  • शेतातली भाजी ताटात
  • शेतातली भाजी ताटात
SHARE

दादर - शेतकऱ्यांची भाजी थेट ग्राहकांपर्यत पोहचवण्याच्या योजनेला मुंबईकरांनी दिलेला तुफान प्रतिसाद पाहून मुंबई ग्राहक पंचायतीने आता याच भाज्यांचे बास्केट तयार करून ते माफक दरात ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचे ठरवले आहे. त्यानुसार प्रत्येक आठवड्याला कुटुंबाच्या गरजेनुसार थेट शेतकऱ्यांकडून आलेली भाजी मुंबईकरांना मिळणार आहे. शेतकऱ्याच्या कष्टाला योग्य भाव मिळावा आणि ग्राहकांनाही ताजी भाजी मिळावी या हेतून मुंबई ग्राहक पंचायतीच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जाणार आहे. मंगळवारी दसऱ्याच्या मुहूर्तावर दादरपासून याची सुरुवात केली जाणार आहे. गेल्याच आठवड्यात गोरेगाव येथे ग्राहक पंचायतीने ‘शेतकऱ्यांची भाजी थेट दारात’ हा उपक्रम राबवला होता. 

 

संबंधित विषय
ताज्या बातम्या