SHARE

मुंबई - 500, 1000 रुपयांच्या चलनातल्या नोटा बंद केल्याचा परिणाम फळमार्केटवरही झालाय. फळबाजारातले व्यापारी आणि त्यांना माल पुरवणारे दलाल यांच्याकडे पैसे नसल्यानं व्यवसायच बंद पडल्याचं चित्र आहे. फळबाजारात ग्राहकही फळखरेदीसाठी फिरकलेला नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. हीच स्थिती आणखी काही दिवस राहिली तर फळं कमी दरानं विकावी लागतील, अशी शक्यता आहे. इथले व्यापारी 500, 1000 रुपयांच्या नोटांना अधिक पसंती देतात. त्यामुळे व्यापारांकडे 500, 1000 रुपयांच्या नोटा अधिक प्रमाणात आहेत.

"या निर्णयामुळे सामान्य व्यापारी भरडले जातायेत. तसंच बुधवार आणि गुरुवार दोन दिवस व्यापारात मंदी राहील," अशी खंत फळ व्यापारी संघटना अध्यक्ष राजाराम लक्ष्मण शिंदे यांनी व्यक्त केली. लवकरच परिस्थिती सुधारेल, अशी अाशाही त्यांनी व्यक्त केली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या