नरिमन पॉइंट - विधानभवन परिसरात शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या संत शिरोमणी सावतामाळी बाजारात भाजीचे भाव वाढलेत. या बाजारात शेतकरी स्वस्त भाजीपाला थेट ग्राहकांच्या विक्रीस आणतात. मात्र आज किरकोळ बाजारातील भावाइतकेच भाजीचे दर होते. तसेच गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजीची दुकानंही कमी लागली होती. आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतातील भाजीपाला खराब झाला आहे. त्यामुळे स्वस्त भाजी विकणे परवडत नसल्याचे साक्री गावचे शेतकरी साहेबराव भामरे यांनी सांगितले.
तुलनात्मक भाजी भाव खालीलप्रमाणे
भाजी |
किरकोळ बाजार भाव |
आठवडे बाजार भाव |
भेंडी |
30 रुपये किलो |
50 रुपये किलो |
वाटाणे |
70 रुपये किलो |
90 रुपये किलो |
टोमॅटो |
15 रुपये किलो |
30 रुपये किलो |
घेवडा |
40 रुपये किलो |
50 रुपये किलो |
वांगी |
40 रूपे किलो |
50 रुपये किलो |