Advertisement

पुन्हा भरला मासळी बाजार


पुन्हा भरला मासळी बाजार
SHARES

प्रतिक्षानगर - दोन दिवस बंद असलेला प्रतिक्षानगरचा मासळी बाजार रविवारी पुन्हा सुरू झाला. 500-100 च्या नोटांचा चाललेला गोंधळ लक्षात घेता सध्या सगळेच कामकाज मंदावले होते. अशीच काहीसी परिस्थिती प्रतिक्षानंगरमधील मासळी बाजारात होती. नोटांच्या गोंधळामुळे बुधवार आणि शुक्रवार या दोन दिवशी मासळी बाजार बंद होता. मात्र अखेर रविवारी मासे विक्रेत्यांनी लोकांकडील 1000-500 च्या नोटा स्वीकारत मासे विक्रीला सुरूवात केली. त्यामुळे स्थानिकांनाही दिलासा मिळाला. आणलेला माश्यांचा माल खराब होण्यापेक्षा तो ग्राहकांना विकलेला बरा म्हणून हा निर्णय आम्ही घेतल्याचे सुवर्णा तावडे या मासे विक्रेत्या महिलेनं सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा