मुंबई - नोटांच्या टंचाईने नागरिक आधीच वैतागलेले असताना मिठाची टंचाई झाल्याची अफवा शुक्रवारी देशभरात पसरली. त्यामुळे अजून नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. अफवा पसरल्यानंतर मीठ खरेदीसाठी नागरिकांनी दुकानांमध्ये गर्दी केली. मीठ महागण्याची अफवा पसरल्यानंतर मुंबईतील अनेक किराणा दुकानांवर मीठ खरेदीसाठी गर्दी झाली. त्यातच दुकानदारांनीही एक किलो मीठासाठी अव्वाच्या सव्वा रुपये आकारले. अफवेमुळे नागरिकांनी 4 ते 5 किलो मीठ एका वेळेस खरेदी केल्याचं ही समोर आलंय.