शिवाजी पार्कमध्ये पहिल्यांदाच शेतकरी आठवडी बाजार

  Shivaji Park
  शिवाजी पार्कमध्ये पहिल्यांदाच शेतकरी आठवडी बाजार
  मुंबई  -  

  दादर - गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत विविध ठिकाणी शेतकरी आठवडी बाजार भरवला जात आहे. त्यानंतर  आज  पहिल्यांदाच शिवाजी पार्क, जिमखाना येथे शेतकरी आठवडी बाजार भरणार आहे. मी मुंबई अभियान आयोजित शेतकरी ते ग्राहक थेट योजनेंतर्गत संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडी बाजार आज संध्याकाळी 4 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत खुला रहाणार आहे. या बाजाराची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे, शेतातील ताज्या भाज्यांव्यतिरिक्त थेट शेतकरी गटांचा उत्पादित माल, सेंद्रिय आणि गावरान भाजीपाला, फळे, मध, चटणी, मसाले, लोणचे, पापड, धान्य, कडधान्य, दुग्धजन्य पदार्थ, गावरान तुप, लोणी हे सर्व प्रकार अगदी स्वस्त दरात मुंबईकरांना उपलब्ध होणार आहेत.

  देशाचा अन्नदाता असलेल्या शेतकऱ्याचा भाजीपाला खरेदी करताना कोणत्याही प्रकारचे भाव करू नका. शेतकरी टिकला तर आपण टिकू, हे लक्षात असू द्या. मुंबई शहराचे ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांच्या मनात असलेले सुंदर चित्र तसेच राहण्यासाठी त्यांना भाजी विक्रीच्या काळात एक मुंबईकर म्हणून पूर्ण सहाय्य करा.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.