टी- २० मुंबई लीगच्या दुसऱ्या सीझनला आजपासून सुरूवात

मुंबईतील एकूण ८ संघामध्ये होणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशन आयोजित टी- २० मुंबई लीगच्या दुसऱ्या सीझनला आजपासून सुरूवात होणार आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर टी-२० मुंबई लीग खेळवण्यात येणार आहे.

SHARE

मुंबईतील एकूण  संघामध्ये होणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशन आयोजित टी- २० मुंबई लीगच्या दुसऱ्या सीझनला आजपासून सुरूवात होणार आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर टी-२० मुंबई लीग खेळवण्यात येणार आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या टी -२० मुंबई लीगचा ब्रॅण्ड अँबेसेडर असून, या स्पर्धेमुळं मुंबईतील स्थानिक खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ मिळालं आहे.

टी -२० मुंबई लीगमध्ये सचिन तेंडुलकर याचा मुलगा आणि वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर खेळताना पाहायला मिळणार आहे. अर्जुन तेंडुलकर याला आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब या संघानं खेळाडूंच्या लिलावावेळी ५ लाख रुपयांना खरेदी केलं आहे


रणजीच्या खेळाडूंचा समावेश

या लीगमध्ये मुंबईच्या रणजी संघाचे श्रेयस अय्यर (नमो बांद्रा ब्लास्टर्स), सूर्य कुमार यादव, आकाश पार्कर (ट्रायम्फ नाइट्स मुंबई नार्थ ईस्ट), शिवम दुबे, सिद्धेश लाड(शिवाजी पार्क लायंस) आणि पृथ्वी शॉ (नार्थ मुंबई पॅंथर्स) या लीगमध्ये खेळणार आहेत.


टी-२० मुंबई लीगचे ८ संघ

नार्थ मुंबई पॅंथर्स : पृथ्वी शॉ, विशाल धागांवकर, आश्रय सजनानी, आदित्य राणे, अतीफ अटारवाला, करन नंदे, मुनदीप मंगेला, नील नार्वेकर, राहुल सावंत, सईद शेख, साईराज पाटील, शशिकांत कदम, विक्रांत आती, यशस्वी जैयस्वाल, अजिंक्य पाटील, ओंकार गुरव, स्वप्निल साळवी, जुदेसिंग, प्रथमेश डाके, प्रवीण तांबे.

नमो बांद्रा ब्लास्टर्स : निखिल पाटील, श्रेयस अय्यर, श्रीदीप मंगेला, आदित्य धुमाळ, रोहित कांबली, सागर छाब्रिया, सक्षम झा, सिद्धार्थ चिटणीस, सुजीत हारावी, सुजीत नायक, यश मालप, एकनाथ केरकर, प्रसाद पवार, अतुल सिंह, कर्श कोठारी, निखिल दाते, सिद्धार्थ शर्मा, उझेर खान.

ट्रायम्फ नाइट्स मुंबई नार्थ ईस्ट : गौरव चव्हाण, करण मोरे, सूर्यकुमार यादव, भरत पाटील, कल्पेश सावंत, करण शाह, मोहित अवस्थी, परीक्षित वालसांगकर, प्रसाद पाटील, पुनीत त्रिपाठी, शिवम निरुपम, उमेश गुर्जर, विनायक भोईर, यश डिचोलकर, शिखर ठाकूर, सिद्धात आदातराव, सुमित गडिगांवकर, रॉयस्टन डायस, वैभव सिंह.

एआरसीएस अंधेरी : अखिल हरवाडकर, केविन अल्मेडा, प्रफुल वाघेला, तन्मय मिश्रा, अमोघ भटकल, अजहर अंसारी, गौरव जाथार, इकबाल अब्दुल्ला, कादिर पटेल, पंकज जैयस्वाल, शुभम रांजणे, वैदिक मुरकर, सुफियान शेख, सुमित मेहर, आकाश पारकर, अंकुर सिंह, अथर्व पुजारी, सलील आगरकर, तुषार देशपांडे, विनीत सिन्हा.

सोबो सुपर सोनिक : अग्नि चोप्रा, हरेश टॅंक, जपजीत रंधावा, मनसिंग निगडे, तुषार श्रीवास्तव, ध्रुमिल मटकर, जय बिस्ता, पराग खानपुरकर, रोहन राजे, संदीप कुंचिकोर, शशांक अटार्डे, वैभव माळी, आदिब उस्मानी, योगेश ताकावळे, आतिफ शेख, अक्षय बर्मा, बद्रे आलम , दीपक शेट्टी, हर्ष तन्ना, खीजर दफेदार.

शिवाजी पार्क लायन्स : रुद्रा धांढे, सिद्धेश लाड, स्वप्निल प्रधान, अरुण यादव, मानन खाखार, मोनील सोनी, ओंकार जाधव, रौनक शर्मा, शिवम दुबे, तनुश कोतियन, वरुण जोयजोदे, हार्दिक तामोरे, निखिल पाटील, सचिन यादव, आतिश गवंड, गौरव बेंग्रे, जय कोठारी , शिवम मल्होत्रा, सिद्धार्थ राऊत, विजय गोहिल.

आकाश टायगर्स एमडब्यूएस : अजय पांडे, डोराईस्वामी सुब्रमण्यम, कौस्तुभ पवार, सूर्यंश शेडगे, वाय पवार, आकर्षित गोमले, अर्जुन तेंडुलकर, भाविन ठाक्कर, नेहल कटकधोंड, शाम्स मुलानी, सिद्धार्थ अक्रे, आकाश आनंद, मेहबूब शेख, अंजदीप लाड, धवल कुलकर्णी, मिनाद मांजरेकर, सलमान खान, सिल्वेस्टर डिसोझा.

ईगल ठाणे स्ट्रायकर्स : कौशिक चिखलीकर, सरफराज खान, सिध्दांत सिंह, ऐश्वर्य सुर्वे, अजिंक्य बेलोशे, अल्पेश रमजानी, अंकुश जैयस्वाल, जयदीप परदेशी, क्रुथिक हनागवाडी, मयूर सानप, प्रशांत सोलंकी, राकेश प्रभु, सचिन वाघ, सागर मिश्रा, आदित्य तारे, श्रीकांत लिंबोळे, असिफ शेख, बलविंदर संधू, प्रशांत भोईर, शार्दुल ठाकूर.हेही वाचा -

व्हीव्हीपॅटमुळे यंदा निकाल लागणार उशीरा

मुंबईत उशीरा दाखल होणार पाऊससंबंधित विषय
ताज्या बातम्या