Advertisement

धोनीपाठोपाठ सुरेश रैनाने केली निवृत्तीची घोषणा

धोनीने सोशल मीडियावरून निवृत्ती जाहीर केल्यानंतर काही वेळातच रैनाने देखील सोशल मीडियावरून निवृत्ती जाहीर करत असल्याचे सांगितले.

धोनीपाठोपाठ सुरेश रैनाने केली निवृत्तीची घोषणा
SHARES

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने शनिवारी सायंकाळी अचानक आपल्या निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या काही मिनिटांतच सुरेश रैनानेही आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. रैनाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन 'आपण धोनीसोबत या प्रवासात आहोत, जय हिंद' अशी पोस्ट केली.


धोनीने सोशल मीडियावरून निवृत्ती जाहीर केल्यानंतर काही वेळातच रैनाने देखील सोशल मीडियावरून निवृत्ती जाहीर करत असल्याचे सांगितले. धोनीला टॅग करत रैनाने इस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तो म्हणतो की, तुझ्या सोबत खेळण्याचा आनंद काही वेगळाच होता. निवृत्तीच्या तुझ्या या प्रवासात मी देखील सहभागी होत आहे. धन्यवाद भारत, जय हिंद!

गेल्या वर्षी रैनाच्या गुढघ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी रैना प्रयत्न करत होता. लसुरेश रैनाने २२६ वनडेमध्ये ३५.३१ च्या सरासरीने ५,६१५ धावा केल्या. यामध्ये ५ शतकं आणि ३६ अर्धशतकांचा समावेश होता. तर ७८ टी-२० मॅचमध्ये रैनाने २९.१६ च्या सरासरीने १,६०४ धावा केल्या.

रैनाने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १ शतक आणि ५ अर्धशतकं झळकावली. १८ टेस्टमध्ये त्याने २६.४८ च्या सरासरीने ७६८ धावा केल्या.  ज्यात १ शतक आणि ७ अर्धशतकांचा समावेश होता. आपल्या पदार्पणाच्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्येच रैनाने शतक केलं होतं.

 रैनाने ३० जुलै २००५ रोजी श्रीलंकेविरुद्धच्या वनडेमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तर १७ जुलै २०१८ ला रैना शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळला. २०११ साली भारताने जिंकलेल्या वर्ल्ड कपच्या टीममध्ये रैना होता. 



हेही वाचा -

महेंद्र सिंग धाेनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा