Advertisement

चमकदार कामगिरीनंतरही अजिंक्य रहाणे टी २० संघाबाहेर


चमकदार कामगिरीनंतरही अजिंक्य रहाणे टी २० संघाबाहेर
SHARES

आॅस्ट्रेलियाविरूद्ध नुकत्याच आटोपलेल्या 'वन डे' सामन्यात चमक दाखविल्यानंतरही भारतीय संघाचा भरवशाचा अोपनर अजिंक्य रहाणेला टी २० संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. यामुळे अजिंक्यचे मुंबईकर फॅन्स चांगलेच निराश झाले आहेत. आॅस्ट्रेलियाविरूद्धच्या ३ टी २० सामन्यांच्या मालिकेसाठी नुकतीच संघनिवड करण्यात आली. त्याची माहिती बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.

'वन डे' सामन्यात रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या मुंबईकर सलामीच्या जोडीने शानदार खेळ करून चाहत्यांची मने जिंकली. या जोडीने ३ शतकी भागीदारी रचत भारतीय संघाच्या विजयाचा पाया रचून दिला. तर अजिंक्यने ५५, ७०,५३, ६१ अशी लागोपाठ ४ अर्धशतके झळकावली. या कामगिरीच्या आधारे त्याची टी २० मालिकेसाठी निवड होणे अपेक्षित होते. परंतु तसे झाले नाही.

भारतीय संघात निवड झाली नसली, तरी अजिंक्य निराश झालेला नाही. निवड समितीने आपले काम योग्य प्रकारे केले असून निकोप स्पर्धेतून पुन्हा एकदा आपण संघात दणक्यात पुनरागमन करू असा विश्वास, अजिंक्यने व्यक्त केला आहे. त्यासाठी तो तयारीलाही लागला आहे.

जलदगती गोलंदाज उमेश यादव आणि शमी यांनाही संघातून वगळण्यात आले आहे. तर विकेटकिपर, फलंदाज दिनेश कार्तिक आणि आेपनर शिखर धवनचे टी २० संघात पुनरागमन झाले आहे.


टी २० चे वेळापत्रक

  • ७ ऑक्टोबर - रांची
  • १० ऑक्टोबर - गुवाहाटी
  • १३ ऑक्टोबर - हैदराबाद


भारतीय संघ - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के.एल. राहुल, मनिष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, एस.एस. धोनी, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आशिष नेहरा आणि अक्षर पटेल.



हेही वाचा -

सुनील गावस्कर यांच्या नावाने स्टेडियम, तेही अमेरिकेत

चार मुंबईकरांची भारत अ क्रिकेट संघात निवड


 

डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा