Advertisement

पृथ्वी शॉला मिळणार का विश्वचषकात संधी?

देवधर कपमध्ये पृथ्वी शॉ इंडिया ए संघाकडून खेळणार आहे. कसोटीत पदार्पणातच उत्कृष्ट फलंदाजी केल्यानंतर त्याने विजय हजारे कपच्या अंतिम फेरीतही उत्कृष्ट खेळी केली होती. यानंतर पृथ्वी देवधर कपमध्ये खेळणार आहे. १८ वर्षीय पृथ्वीसोबत फिरकीपटू आर अश्विन, यष्टिरक्षक दिनेश कार्तिक, फलंदाज अजिंक्य रहाणे आणि सुरेश रैना हे खेळाडू देखील देवधर कपमध्ये खेळणार आहे.

पृथ्वी शॉला मिळणार का विश्वचषकात संधी?
SHARES

देवधर कपमध्ये उत्कृष्ट खेळी करणाऱ्या खेळाडूला २०१९ च्या विश्वचषकात भारतीय संघात खेळण्याची संधी देण्याचा निर्णय बीसीसीसआयच्या निवड समितीने घेतला आहे. दरम्यान, कसोटी सामन्यात पदार्पण करताच दमदार शतक ठोकणारा पृथ्वी शॉ देखील देवधर कपमध्ये खेळणार आहे. त्यामुळे २०१९ च्या विश्वचषकात पृथ्वीला खेळण्याची संधी मिळणार का? याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून आहे.

'हे' खेळाडूही खेळणार

देवधर कपमध्ये पृथ्वी शॉ इंडिया ए संघाकडून खेळणार आहे. कसोटीत पदार्पणातच उत्कृष्ट फलंदाजी केल्यानंतर त्याने विजय हजारे कपच्या अंतिम फेरीतही उत्कृष्ट खेळी केली होती. यानंतर पृथ्वी देवधर कपमध्ये खेळणार आहे. १८ वर्षीय पृथ्वीसोबत फिरकीपटू आर अश्विन, यष्टिरक्षक दिनेश कार्तिक, फलंदाज अजिंक्य रहाणे आणि सुरेश रैना हे खेळाडू देखील देवधर कपमध्ये खेळणार आहे.

इंडिया ए, इंडिया बी आणि इंडिया सी या तीन संघांमध्ये हा सामना खेळला जाणार आहे. त्यामुळं देवधर कपनंतर कोणत्या खेळाडूला २०१९ च्या विश्वचषकात खेळण्याची संधी मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा -

भारत वि. वेस्ट इंडिज: दुसऱ्या टेस्टसाठी संघ जाहीर

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा